मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची दिल्लीत भेट घेतली. सुमारे अर्धा तास चाललेल्या या बैठकीत दोन्ही नेत्यांमध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून चर्चा झाली. यावेळी मराठा आरक्षणप्रश्नावर तोडगा काढण्यासाठी महाराष्ट्रातील खासदारांचं एक शिष्टमंडळ पंतप्रधानांकडे नेण्याचा निर्णय घेण्यात आला.
मात्र,शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांनी मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्यावर पुन्हा एकदा टीकास्त्र सोडलं आहे. अशोक चव्हाण हे दिल्लीत मराठा आरक्षणावरील सुनावणीबाबत वकिलांशी चर्चा करायला गेले नाहीत. त्यांना आरक्षणाचं काहीच पडलेलं नाही. काँग्रेस नेते राजीव सातव हे महाराष्ट्राचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होऊ नयेत यासाठी मोर्चेबांधणी करायला चव्हाण दिल्लीत गेले आहेत, असा आरोप विनायक मेटे यांनी केला आहे
#VinayakMete #AshokChavan #UddhavThackeray #SharadPawar #MarathaReservation #RajivSatav #MaharashtraCongress #BalasahebThorat #Maharashtra #Congress #BJP #MahaVikasAghadi