HW News Marathi
व्हिडीओ

कोरोनाचा नवा प्रकार, वेगाने होतोय प्रसार..नेमकं काय आहे प्रकरण ?

२०२० हे जवळपास अखंड वर्ष कोरोनासारख्या जागतिक महामारीशी लढा देण्यात आणि या विळख्यातून बाहेर पडण्याच्या प्रयत्नात गेले. त्यानंतर आता कोरोना लसीची निर्मिती अंतिम टप्प्यात असल्याने येणाऱ्या नववर्षात लवकरच आपल्याला दिलासा मिळेल अशी एक भावना सर्वांच्याच मनात असताना आता संपूर्ण जगाला एक हादरा बसला आहे. युरोपात कोरोना व्हायरसची एक नवी प्रजाती सापडली आहे.कोरोनाच्या विषाणूमध्ये म्युटेशन (बदल) होऊन तयार झालेला हा नवा विषाणू आणखी घातक असण्याची शक्यता आहे. शास्त्रज्ञांनी या विषाणुला B.1.1.7 असे नाव दिले आहे आणि याच पार्श्वभूमीवर आता वेगवेगळ्या देशांतील निर्बंध अधिक कडक करण्यात आले आहेत. दरम्यान, आता असं म्हटलं जातंय की कोरोनाची ही नवी प्रजाती अधिक वेगानं पसरत आहे आणि या प्रजातीविषयी अधिक माहिती मिळवली आहे. पण, सध्यातरी याबाबतचे अनेक अनुत्तरित प्रश्न सगळ्यांसमोर आहेत. दरम्यान, कोणतेही विषाणू हे नेहमीच म्यूटेट (रूप बदलत) होत असतात. त्यामुळे विषाणू जर रुप बदलत असेल तर त्यावर लक्ष केंद्रीत करणं महत्त्वाचं असतं, असेही म्हटलं जात आहे.

#NewStrainOfCoronaVirus #Covid19 #India #NewStrainOfCoronaVirusUK #Maharashtra #UK #UddhavThackeray #NarendraModi

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Devendra Fadanvis BJP | चंद्रकांतदादा आत्ताच प्रदेशाध्यक्ष झालेत, आधी त्यांना स्थैर्य मिळू दे !

Gauri Tilekar

तुम्ही तर राजकारण करत नाही ना? राज्यपालांचा प्रश्न…

News Desk

BJP-Chandrakant Patil | भाजपचं पुढचं ऑपरेशन ” सांगलीचे दादा घराणे “

Arati More