सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते धनंजय मुंडे कालपासून एका प्रकरणात अचणीत सापड्याचे दिसून येत आहे…रेणू शर्मा या महिलेने ती गायिका असल्याचं सांगत बलात्काराचा आरोप केला आहे..ओशिवरा पोलिस ठाण्यात तक्रारही दाखल केली आहे… मात्र, धनंजय मुंडे यांनी बलात्काराचा आरोप फेटाळत रेणू शर्माच्या मोठ्या बहिणीशी म्हणजे करुणा शर्माशी सहमतीने संबंध होते याची स्वत: कबूली दिली आहे… करुणा पासून २ अपत्य असल्याचेही त्यांनी कबूल केले आणि याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांना, पत्नीला माहित आहे..त्या २ मुलांना त्यांनी त्यांचे नाव दिले आहे असेही त्यांनी फेसबूकवर पोस्ट केलेल्या पोस्टमध्ये आहे.. दरम्यान, या मुद्यावरुन राजकीय वातावरण चांगलेच तापलेले दिसत आहे..प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपने ठाकरे सरकारवर आणि धनंजय मुंडेंवर टीका करण्यास सुरुवात केली आहे.. इतकंच नाही तर धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचीही मागणी केली आहे..
#DhananjayMunde #KiritSomaiya #UmaKhapare #BJP #NCP #KarunaSharma #RenuSharma #RajashriMunde #SharadPawar #UddhavThackeray AjitPawar