HW News Marathi
Covid-19

शरद पवारांच्या मुंबईतील ‘सिल्व्हर ओक’ बंगल्यात कोरोनाचा शिरकाव !

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक बंगल्यातील २ सुरक्षारक्षकांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. हे दोघेही जण शरद पवारांच्या ताफ्यातील सुरक्षारक्षक असल्याची माहिती आहे. दरम्यान यांपैकी कुणीही शरद पवारांच्या संपर्कात नव्हते अशीही माहिती मिळत आहे.

रॅपिड टेस्टमध्ये सिल्व्हर ओकवरील २ कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. सिल्व्हर ओकवरील इतर सर्व कर्मचारी आणि शरद पवारांच्या पीएंचीही कोरोना चाचणी करण्यात आली आहे. तसेच, काल (१६ ऑगस्ट) शरद पवार पत्नी प्रतिभा पवार यांच्यासह पुण्याला गेले होते आणि काल रात्री मुंबईला परत आले आहेत.दरम्यान या पार्श्वभूमीवर शरद पवार हे पुढील काही दिवस कुणालाही भेटणार नसल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थाना बाहेरील चहावाला तसेच काही सुरक्षा रक्षकांना कोरोना झाला होता. तसेच, काही राजकीय नेत्यांना देखील कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार गेले काही दिवस राज्यातील काही भागात कोरोनाची स्थिती काय आहे याचा आढावा घेण्यासाठी देखील दौरे करून आले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोविडच्या पार्श्वभूमीवर सुपर स्पेशालिटी रुग्णालय लवकर कार्यान्वित करण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश

Aprna

कोरोनाचे युद्ध २१ दिवस नाही २०२१ पर्यंत सुरू राहणार

News Desk

कोरोना संसर्गाच्या निदानासाठी चाचण्या वाढवा! – डॉ. राजेंद्र शिंगणे

Aprna