HW News Marathi
राजकारण

अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार, धनंजय मुंडेंना धस यांचा इशारा

‘माझ्यावर १५ कोटी घेतल्याचा आरोप करणाऱ्यांवर मी अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार आहे. फक्त धनंजय मुंडे यांनी त्यांच्या वक्तव्यावर ठाम राहावे’ असं आव्हान सुरेश धस यांनी धनंजय मुंडे आणि अजित पवारांना दिले आहे. आष्टीमध्ये बाळासाहेब आजबे यांच्या पक्षप्रवेश सोहळ्यादरम्यान धनंजय मुंडे आणि अजित पवार यांनी सुरेश धस यांच्यावर टीका केली होती. सुरेश धसांनी ५ सदस्यांसाठी १५ कोटी घेतल्याचा आरोप धनंजय मुंडे यांनी केला होता. या आरोपाला प्रत्युत्तर देत धनंजय मुंडे यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचं सुरेश धस यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं आहे. या पत्रकार परिषदेदरम्यान सुरेश धस यांनी धनंजय मुंडे आणि अजित पवारांवर सडकून टीका केली. ‘जे आपल्या काकांचे होऊ शकले नाही ते पवार काका-पुतण्याचे काय होणार?’ अशी टिका सुरेश धसांनी धनंजय मुंडेवर केली.’मागच्या दाराने आमदार झालेल्यांनी आधी जनतेतून निवडून यावे आणि मगच बढाया माराव्यात’ असा टोलाही त्यांनी धनंजय मुडेंना लगावला. याबरोरच धसांनी अजिप पवारांवर देखील टीका केलीय. ‘मी पक्षाची फसवणूक केली नाही. माझी भूमिका अजित पवारांना आधीच सांगितली होती. जिल्हा बँक प्रकरणात जामिनावर बाहेर असलेल्यांनी आम्हाला जेलची भाषा शिकवू नये, असा टोला लगावतानाच त्यांनी जिल्हा बँकेचे पैसे भरावेत, असा सल्ला सुरेश धसांनी पवारांना दिलाय.

पत्नीबाबत काढलेल्या उदगारांना प्रत्युत्तर

‘आपल ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पाहायचं वाकून अशी त्यांची सवय आहे. त्यामुळे अशी भाषा वापरू नये. मलाही त्यांच्याबद्दल बरीच माहीती आहे. त्यावर मी अजुन काही बोललेलो नाही मात्र आता बोलणार’ अशी जोरदार टीका सुरेश धस यांनी अजित पवारांवर केली आहे. पवारांनी सुरेश धस यांच्या पत्नीबाबत काढलेल्या उदगारांना त्यांनी हे प्रत्युत्तर दिले आहे.

राष्ट्रवादीचा इतिहास गद्दारांचा

मला गद्दार म्हणणाऱ्यांनी आधी पक्षाचा इतिहास तपासून पाहावा’ अशी टीका धस यांनी अजित पवारांवर केली आहे.‘राष्ट्रवादीचा इतिहास गद्दारांचा आहे. मला चंगू-मंगू म्हणणाऱ्यांना आष्टीत का यावे लागले?’ अशी टीका करतानाच राष्ट्रवादीतही काळू-बाळू असल्याचा टोला त्यांनी पवारांना लगावला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रामदास आठवले आज घेणार केंद्रीय मंत्रिपदाची शपथ

News Desk

ईव्हीएमची पूजा केल्याप्रकरणी छिंदमवर गुन्हा दाखल

News Desk

सर्वण आरक्षणाचा लाभ घेण्यापूर्वी ‘या’ अटी जाणून घ्या 

News Desk