HW News Marathi
राजकारण

राज्यात ४४ लाख बोगस मतदार, प्रदेश काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे तक्रार

विशाल पाटील | राज्यात ४४ लाखांहून अधिक बोगस मतदार असल्याची गंभीर तक्रार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने आज (फेब्रुवारी) निवडणूक आयोगाकडे केली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने आज राज्यातील प्रमुख राजकीय पक्षांना चर्चेसाठी बोलावले होते. याप्रसंगी काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने ही गंभीर बाब आयोगाच्या निदर्शनास आणून दिली. राज्यात एकूण ४४ लाखांपेक्षा अधिक मतदारांची नावे एकाहून अधिक वेळा मतदार यादीमध्ये नोंदली गेल्याची बाब काँग्रेसने आयोगासमोर पुराव्यानिशी मांडली आहे.

मागील अनेक महिने मतदार यादीचा अभ्यास केल्यानंतर काँग्रेस पक्षाने बुथनिहाय राज्यातील सर्वच्या सर्व २८८ विधानसभा मतदारसंघात एकाहून अधिक वेळा नोंदणी असलेली ४४ लाखांहून अधिक मतदारांची यादी तयार केली आहे. ही यादीच काँग्रेसच्या शिष्टमंडळाने आज केंद्रीय निवडणुक आयुक्त अशोक लवासा, सुशील चंद्र व राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी अश्विनी कुमार यांना सादर केली. ही बाब अतिशय गंभीर असून या द्वारे निष्पक्ष मतदान प्रक्रियेला बाधा निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने तातडीने या नावांची छाननी करून त्यांना मतदार यादीतून वगळण्यात यावे, अशी मागणी काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने केली. या संदर्भात चौकशी करण्याचे आश्वासन निवडणूक आयोगाने दिले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिवसेनेच्या लिलाधर डाके यांची मिझोरामच्या राज्यपालपदी होणार नियुक्ती

News Desk

“…त्यांनी एकत्र येऊ नये का?”, अजित पवारांची मनसे, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या संभाव्य युतीवरील प्रतिक्रिया

Aprna

मुंबई सेंट्रल टर्मिनसला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्या !

News Desk