HW News Marathi
राजकारण

अयोध्या प्रकरणाची आजपासून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

नवी दिल्ली | गेल्या एक शतकाहून अधिकहून काळ हिंदू आणि मुस्लिमांमध्ये वाद असलेल्या अयोध्येतील रामजन्मभुमी-बाबरी मशिदीच्या २.७७ एकर जागेवर सर्वोच्च न्यायालय आज (२९ ऑक्टोबर)ला सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश न्या. रंजन गोगोई, न्या. संजय कृष्ण कौल व न्या. के.एम. जोसेफ यांच्या खंडपीठाच्याबोर्डावर सुनावणी होणार आहे.

याआधी अलाहाबाद उच्च न्यायालयाने २०१० मध्ये निर्णय दिला होता की, वाद्रगस्त जागेवर मशिदीच्या आधी राम जन्मभूमी असल्याची बाब अलाहाबाद उच्च न्यायालयाने मान्य केली होती. परंतु जमिनीला रामलला विराजमान, निर्मोही अखाडा, आणि सुन्नी वक्फ बोर्ड यांच्यात वाटण्याचा आदेश न्यायालयाने दिला होता.

जमिनीची एक तृतीयांश जागा मुस्लीम गटाला दिली होती, तर तीन गटात ही जमीन विभागण्याचा निर्णय दिला होता. मात्र या निर्णयानंतर सर्वांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. तेव्हापासून या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. या प्रकरणाची अंतिम सुनावणी आगामी लोकसभा निवडणुकीच्या आधी निकाल लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#MarathReservation : मी मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीसाठी गेलेच नव्हते !

News Desk

द्रौपदी मुर्मी देशाच्या 15 व्या राष्ट्रपती, आज सरन्यायाधीश देणार गोपनीयतेची शपथ

Aprna

भाजप सरकारने तोट्यातल्या कंपनीसाठी सरकारी कंपन्यांवर दबाव टाकू नये | संजय निरुपम

News Desk