HW News Marathi
राजकारण

“राजा का बेटा म्हणून राजा होणार नाही”, शुभांगी पाटील यांचा सत्यजीत तांबेंना टोला

मुंबई | “राजा का बेटा म्हणून राजा होणार नाही. ज्याता काही तरी आहे तोच राजा होणार”, असा टोला अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील (Shubhangi Patil) यांनी अपक्ष उमदेवार सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) यांना लगावला आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या (Nashik Graduate Constituency) निवडणुकीत काँग्रेसकडून विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी दिली होती. पक्षाकडून एबी फॉर्म मिळूनही डॉ. सुधीर तांबेंनी त्यांनी उमदेवारी अर्ज भरला नाही. परंतु, डॉ. सुधीर तांबे यांचे चिरंजीव सत्यजीत तांबे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली. यानंतर महाविकास आघाडीने सत्यजीत तांबेला पाठिंबा न देण्याच्या निर्णयानंतर अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांनी आज (14 जानेवारी ) मातोश्रीवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.

तुमच्या विरोधात सत्यजीत तांबे आहेत, याकडे तुम्ही कसे बघता शुभांगी पाटील म्हणाल्या, “जे पदवीधर आहेत, बाकीच्या विधानसभेच्या निवडणुका या वेगळ्या आहेत. परंतु, पदवीधर त्यांच्यासाठी प्रत्यक्ष मी लढलेले आहे. मी आझाद मैदानावर आंदोलन केला आहे. मी अन्न व जल त्याग केलेला आहे. ज्यांने मी म्हणणे ज्यांनी प्रत्यक्ष काम केलेले आहे. राजा का बेटा म्हणून राजा होणार नाही. ज्यांता काही तरी आहे तोच राजा होणार.”

मी सगळ्यांकडे पाठिंबा मागते

भाजपमध्ये गेलेला होता आणि आता शिवसेनेकडून पाठिंबा मिळतोय, कशा पद्धतीने पाठिंबा मिळतोय, या प्रश्नावर शुभांगी पाटील म्हणाल्या, “मला भाजपकडून एबी फॉर्म आला नाही. म्हणून अपक्ष सगळे आहोत. त्यामुळे माझे पक्षश्रष्ठी होते, सगळ्यांकडे पाठबळ मागते.” शिक्षक संघटना उभी केल्याचा तुम्हा फायदा होईल का?, शुभांगी पाटील म्हणाल्या, “मी शिक्षक संघटनेची अध्यक्षा होती. गेल्या 10 वर्षात मी सलग आझाद मैदानात लढत होती. म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीला संधी मांगितली होती. विना अनुदानीत आणि अनुदानीतला बऱ्याच ठिकाणी न्याया दिलेला आहे, अशा महिलेला न्याया दिलेला पाहिजे.”

 

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लोकसभा निवडणुकीत कोण देणार उदयनराजेंना टक्कर ?

News Desk

काँग्रेसकडून शत्रुघ्न सिन्हा यांना पाटना साहिबमधून उमेदवारी जाहीर

News Desk

फक्त ५९ मिनिटांमध्ये मिळणार कर्ज, पंतप्रधान मोदींची घोषणा

Gauri Tilekar