HW News Marathi
राजकारण

आमची ५ वर्षे विरोधकांची रखडलेली काम करण्यातच गेली !

मुंबई । शिवसेना नेते आणि वरळी विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार आदित्य ठाकरे यांनी पुरंदर विधानसभा मतदारसंघाच्या प्रचारार्थ आयोजित सभेत बोलताना जनतेला भावनिक आवाहन केले आहे. “आपण प्रचारासाठी नव्हे तर स्वतःसाठी आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहोत. नवा महाराष्ट्र घडविण्यासाठी मला तुमची साथ हवी आहे”, असे म्हणत भावनिक साद घातली आहे.

दित्य ठाकरेंच्या पुरंदर येथील भाषणातील महत्त्वाचे मुद्दे :

  • मंत्रिपदासाठी नव्हे तर जनतेचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्रभर प्रचार करत आहे.
  • इथे प्रचारासाठी नव्हे तर स्वतःसाठी आशीर्वाद घेण्यासाठी आलोय
  • नवा महाराष्ट्र घडविण्यासाठी तुमची साथ हवीय
  • जिथे हिंदुहृदयसम्राटांचे चित्र असेल तिथे कधीच खोत बोलू शकत नाही
  • इतर पक्षांचा जाहीरनामा असेल, पण शिवसेनेचा नेहमी वचननामाच राहील
  • शिवसेना नुसते वचन देत नाही तर ते पूर्ण करते
  • विजयबापू शिवतारें माझे मंत्रिमंडळातील आवडते मंत्री
  • त्यांची विकासकामे बघून मला शिकण्याची संधी मिळाली
  • आता मुख्यमंत्र्यांनीसुद्धा बापूंच्या कार्याची दाखल घेतली
  • जे मुख्यमंत्र्यांना जमले नाही ते विजयबापूंनी करून दाखविले
  • त्यांनी या मतदारसंघासाठी तब्बल १० हजार कोटींची तरतूद करून विकासकामे पूर्ण केली
  • आता त्यांची गरज फक्त इथेच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला आहे
  • पुरंदर मतदारसंघातील विकासकामांसारखी कार्ये आता त्यांच्या साथीने संपूर्ण महाराष्ट्रभर करण्याचा निर्धार
  • कर्जमाफी नव्हे तर कर्जमुक्ती करायचीय
  • शिवसेनेच्या प्रयत्नांमुळे १० लाख शेतकऱ्यांना ९०० कोटींचा पीक विमा मंजूर करण्यात यश
  • महिला बचत गटांच्या मदतीने संपूर्ण महाराष्ट्रात १० रुपयांत जेवण देणारी १००० भोजनालये सुरु करण्याचा निर्धार
  • संपूर्ण महाराष्ट्रात शिक्षण आणि शिक्षणाचा दर्जा समसमान करणार
  • खेड्यांतील विद्यार्थ्यांसाठी २५०० विदयार्थी बसेस सुरु करणार
  • गेली १५ वर्षे विरोधकांनी सत्तेची मजा घेतली पण लोकांची कामे रखडून ठेवली
  • गेली पाच वर्षे तीच रखडलेली कामे पूर्ण करण्यात गेली
  • त्यामुळे आता नवा महाराष्ट्र घडवायचा आहे आणि त्यासाठी तुमची साथ हवीय

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुण्यात शिवसैनिकांचा रास्ता रोको, इंधन दरवाढीचा निषेध 

News Desk

#LokSabhaElections2019 : सुजय विखे पाटील यांचा अखेर भाजपमध्ये प्रवेश

News Desk

रामाचा पुतळा उभारण्यापेक्षा मंदिर बांधण्यावर भर द्या, धर्मगुरुंचा योगींना सल्ला

News Desk