नवी दिल्ली | लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यातील प्रचार आज (९ मे) संपला आहे. सर्व राजकीय नेते प्रचारादरम्यान आरोप-प्रत्यारोपाच्या फौऱ्या झाडत आहेत. यात भाजप पूर्व दिल्लीचे उमेदवार आणि किक्रेटर गौतम गंभीर यांनी आक्षेपार्ह टीप्पणी केल्याचा आरोप आपच्या पूर्व दिल्ली मतदारासंघातील उमदेवार अतिशी यांनी केला आहे. अतिशी यांनी आज (९मे) पत्रकार परिषद घेऊन, गौतम गंभीर यांनी काढलेले एक पत्रक वाचून दाखविले. हे पत्रक वाचताना अतिशी यांना अक्षरक्ष: रडू कोसळले. या पत्रकात त्यांच्या उल्लेख ‘मिश्र जाती’चा असा करण्यात आला होता. या पत्रकात अतिशी यांच्याबद्दल अपमानस्पद उल्लेख केला होता.
AAP East Delhi LS seat candidate Atishi breaks down during a press conference alleging BJP's Gautam Gambhir of distributing pamphlets with derogatory remarks against her says,"They've shown how low they can stoop.Pamphlet states that 'she is very good example of a mixed breed'." pic.twitter.com/z14MXXh574
— ANI (@ANI) May 9, 2019
”ती एक मिश्र जातीची असल्याचे उत्तम उदाहरण आहे” असा आशय असलेली अपमानजनक पत्रके गौतम गंभीर यांच्याकडून मतदारसंघात वाटण्यात आली असल्याचा गौतमवक गंभीर आरोप केला आहे. सदर पत्रक त्यांनी पत्रकार परिषदेत वाचूनही दाखविले. माझ्यासारखी व्यक्ती राजकारणात यासाठी येत नाही, की तिला पैसा पाहिजे. वडील उत्तर प्रदेशातील जाट, आई पंजाबी आणि पती आंध्र प्रदेशातील ख्रिश्चन अशा प्रकारे मी एक मिश्र जातीची असल्याचा घाणेरडा अपप्रचार पत्रकाच्या माध्यमातून केला जात असल्याचे अतिशी यांनी सांगितले.
Gautam Gambhir, BJP's East Delhi candidate: I will definitely file a defamation case against them. You can't tarnish someone's image just like that, if you don't have the proof. I have never given a negative statement against anyone so far in my election campaigning. https://t.co/nETmu7SryS
— ANI (@ANI) May 9, 2019
अतिशी यांनी केलेल्या आरोपानंतर गौतम गंभीरने त्यांच्यावर केलेल्या आरोपचे खंडण करत म्हटले की, “तुमच्याकडे पुरावे असतील तर ते दाखवा. तुमच्या आरोपात तथ्य असेल तर मी राजकारण सोडने. मी माझ्या प्रचारादरम्यान कोणाविरोधातही आक्षेपार्ह वक्तव्य केले नाही. उलट अतिशी यांनी माझ्यावर खोटे आरोप लावून माझी बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे मी त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचे गौतम गंभीरने म्हटले आहे.”
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.