नवी दिल्ली |“लोकांना मोदी सरकारचा कंटाळा आहे. त्यांना बदल हवा आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव निश्चित आहे”, असा दावा आम आदमी पेक्षाचे राष्ट्रीय समन्वयक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. त्याचसोबत “आगामी लोकसभा निवडणुकीत आप पंजाबमधील एकूण १३ जागा लढविणार आहे”, अशी माहिती देखील केजरीवाल यांनी रविवारी (२० जानेवारी) दिली आहे.
"@narendramodi और @AmitShah के शासन ने देश को बर्बाद कर दिया है 5 सालों में नफ़रत का जहर घोलकर।
अगर ये 2019 में भी आ गए तो देश के टुकड़े टुकड़े कर देंगे"- @ArvindKejriwal #AKinBarnala pic.twitter.com/hiWMgj59OR— AAP (@AamAadmiParty) January 20, 2019
पंजाबमधील काही वरिष्ठ नेत्यांशी केजरीवाल यांनी चर्चा केली असून पंजाबमधील लोकसभा जागांसाठी आपकडून ५ उमेदवारांची नावे या आधी जाहीर करण्यात आली होती. त्यात पंजाबमधील संगरुर, फरीदकोट, होशियारपूर, अमृतसर आणि आनंदपूर साहिब या मतदारसंघांचा समावेश आहे.
आम आदमी पक्षाच्या आमदार आणि ज्येष्ठ नेत्यांची शुक्रवारी (१८ जानेवारी) बैठक झाली होती. या बैठकीत ‘आप’ महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि,गुजरात या राज्यात लोकसभा निवडणुका लढणार नाही. या राज्यात आमचे तितके समर्थक नसल्यामुळे आमच्या पक्षश्रेष्ठींनी हा निर्णय घेल्याचे आपच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रिती मेनन यांनी एच. डब्ल्यू मराठीसोबत बोलताना सांगितले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.