HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

दानवेंसोबत अब्दुल सत्तार यांनी विमान प्रवास केल्याने पुन्हा एकदा भाजप प्रवेशावर चर्चा

औरंगाबाद | काँग्रेसने औरंगाबादमधून लोकसभेचे तिकीट  न दिल्यामुळे नाराज आमदार अब्दुल सत्तार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. सत्तार यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि अब्दुल सत्तार यांच्यासोबत काल (३ एप्रिल) रात्री औरंगाबाद येथील चिकलठाणा या विमानतळावर व्हीआयपी कक्षात अर्धा तास बैठक पार पडली. या बैठकीनंतर सत्तार आणि दानवे दोघेही एकाच विमानाने मुंबईला रवाना झाले.

सत्तार हे सिल्लोडचे आमदार यांच्या जागी सुभाष झांबड यांना काँग्रेसने दिलेली उमेदवारी मान्य नसल्याचे सांगत त्यांन बंड पुकारले होते. लोकसभेच्या निवडणुकीत अपक्ष उभे राहणार असल्याचे सत्तार यांनी म्हटले होते. यानंतर सत्तार यांनी २३ मार्च रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली होती.  या भेटमुळे सत्तार यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार का? यावर राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या होत्या. आता पुन्हा एकदा दानवे आणि जलसंधारण मंत्री राम शिंदे यांच्यासोबत सत्तार यांची बैठक झाल्याने चर्चेला उधाण आहे आहे.

 

 

 

Related posts

प्रियांका गांधींच्या ट्विटर अकाऊंटला जोरदार प्रतिसाद

News Desk

बेस्टच्या संपावर उद्या उच्चस्तरीय समितीची बैठक

News Desk

मल्लिकार्जुन खर्गेंची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या प्रभारीपदी नियुक्ती

News Desk