पुणे। राज्यात विधानसभा निवडणुकीच्या बिगुल वाजले आहे. यानंतर प्रत्येक राजकीय पक्षांनी जोरदार तयारी करण्यास सुरुवात केली. तर बिग बॉस फेम अभिजीत बिजुकले अखिल बहुजन समाज सेना पक्षातर्फे राज्यातील २८८ उमेदवार निवडणूक लढवणार असल्याची माहिती काल (२५ सप्टेंबर) पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत केली आहे.
शरद पवारांवर गुन्हा दाखल करण्याआधी इतके दिवस हे झोपले होते का? आताच का गुन्हा दाखल करत आहात ? दहा वर्षे काय केले? महाराष्ट्र सुजलाम सुफलाम करण्यात पवारांचे प्रयत्न आहेत, असेही ते म्हटले. दरम्यान शरद पवार उभे राहिले तर त्यांच्या विरोधात १०० टक्के लढणार असल्याचेही त्याने सांगितले. दरम्यान उदयनराजेंविरोधात लढलो तर मग पवारांना का सोडू? असे म्हणत बिचुकले यांनी सातारच्या पोट निवडणुकीत उतरणार असल्याचा सूचक इशारा दिला आहे. तर शरद पवार यांच्या विरोधात लढण्याचीही तयारी त्यांनी दाखवली आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.