HW News Marathi
राजकारण

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या सर्व जागांवर अभाविपचा विजय

मुंबई | महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या (एमयुएचएस) विद्यार्थी परिषद तसेच अधिसभेसाठी झालेल्या वर्ष २०१८-१९ निवडणूकांमध्ये अभाविपचा दणदणीत विजय झाला आहे. विद्यार्थी परिषदेच्या एकूण ६ जागांपैकी ६ तसेच अधिसभेच्या ३ जागांपैकी ३ अशा एकूण ९ जागांवर अभाविपचे उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत.

नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या अंतर्गत राज्यभरातील ३५० महाविद्यालये येतात. ४ डिसेंबर रोजी अर्ज भरण्यात आले आहेत. अधिसभेसाठी झालेल्या निवडणुकीत अभाविपचे अभिनंदन बकोरिया (अमरावती), पद्मसिंह जामकर (बीड) व निखिल चौधरी(धुळे) यांची बिनविरोध निवड झाल्याचे विद्यापीठातर्फे जाहीर करण्यात आले आहे.

तसेच विद्यार्थी परिषदेच्या ६ जागांसाठी १८ डिसेंबर रोजी नाशिक येथे झालेल्या निवडणूकीत सर्व जागांवर अभाविपचे उमेदवार विजयी झाले. विविध पदांवर विजयी झालेले विद्यार्थी खालीलप्रमाणे –

अध्यक्ष – शिवराज काळे (मुंबई)

उपाध्यक्ष – तृप्ती जोशी (नाशिक)

उपाध्यक्ष – पवन भोईर (गडहिंग्लज)

सचिव – सौरव मुळे (कोल्हापुर)

सहसचिव – गायत्री कुलकर्णी (मुंबई)

सहसचिव – प्रेरणा सुर्यवंशी (संगमनेर)

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देवेंद्र फडणवीस ‘बोगस माणूस’ तर शरद पवार ‘अविश्वासू’ !

News Desk

निवडणूक लढवू नये म्हणून डायनामाइटचा स्फोट घडवून नक्षलवाद्यांनी उध्वस्त केले नेत्याचे घर

News Desk

केंद्र सरकारची मोठी घोषणा; LPG सिलिंडरवर 200 रुपयांची सबसिडी

Aprna