HW News Marathi
राजकारण

पंतप्रधान मोदींच्या सभेसाठी रस्त्यावरचे गतिरोधक हटविल्याने अपघात

मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. नुकताच कल्याण मेट्रो प्रकल्पाचे भूमिपूजन सोहळा पार पडला असून या मेट्रो प्रकल्पाचे भूमिपूजन मोदींच्या हस्ते करण्यात आले आहे. दरम्यान, मोदींच्या या महाराष्ट्र दौ-यासाठी अती दक्षता घेण्यात येत असल्याचे दिसत आहे. कल्याणमध्ये पंतप्रधान मोदींसाठी बनविण्यात आलेल्या हेलिपॅडसाठी चक्क रस्त्यावरील गतिरोधकच काढून टाकण्यात आले आहेत. हे गतिरोधक काढल्यामुळे एका कार आणि सायकलचा अपघात झाला आहे. या अपघातात २ सायकलस्वारांना गंभीर दुखापत झाली आहे.

कल्याण येथील बापगाव येथे पंतप्रधान मोदींसाठी हेलिपॅड बनविण्यात आले. त्यामुळे बापगाव ते फडके मैदाना दरम्यानच्या रस्त्यावरील सर्व गतिरोधक काढण्यात आले. या रस्त्यावर भरधाव वेगाने येणाऱ्या कारने २सायकस्वारांना धडक दिली. या अपघातात या सायकलस्वारांना गंभीर दुखापत झाली आहे. या कारने दोन पोलिसांना देखील धडक दिली आहे. यात पोलिस किरकोळ जखमी असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दिल्लीसह मुंबईतील बीबीसीच्या कार्यालयावर आयकर विभागाचे छापे

Aprna

अटल बिहारी वाजपेयी यांच्या कुटुंबीयांनी नाकारल्या सर्व सरकारी सुविधा

News Desk

मला १००० % विश्वास आहे कि टीडीपी विजयी होईल !

News Desk