HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

उर्मिला मातोंडकर यांच्यावर हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप

मुंबई | आगामी लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेसच्या उत्तर मुंबई मतदारसंघाच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर यांच्यावर हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप करत भाजपकडून पवई पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली आहे. हिंदू धर्म हा जगातील सर्वात हिंसक धर्म असल्याचे उर्मिला यांनी एक टीव्ही शोमध्ये म्हटल्याचा आरोप सुरेश भाजप नेते सुरेश नखुआ यांनी केला आहे. या तक्रारीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि एका पत्रकाराच्या नावाचाही समावेश करण्यात आला आहे. उर्मिला यांनी मात्र आपल्यावरील हे सर्व आरोप फेटाळले आहेत.

उर्मिला मातोंडकर यांनी बुधवारी (२७ मार्च) काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. काँग्रेसकडून उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे आता आगामी निवडणुकांमध्ये उर्मिला मातोंडकर आणि भाजपचे विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी आमने-सामने येणार आहेत. २०१४ साली याच मतदारसंघातून माजी मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांचा तब्बल ४ लाख मतांनी पराभव झाला होता.

Related posts

जगातील ह्या आभासी मोठ्या पक्षाची सध्या लावारीस भक्तांवरच भिस्त, मनसेचे प्रत्युत्तर

News Desk

आम्हाला त्यावेळी काँग्रेसने प्रतिसाद दिला नाही, आता आम्ही मागे हटणार नाही !

News Desk

वीर सावरकर पुन्हा दुर्दैवी ठरले ही वेदना आहेच!

News Desk