HW News Marathi
राजकारण

अभिनेत्री आसावरी जोशी यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

मुंबई | अभिनेत्री आसावरी जोशी यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे. आसावरी यांनी हिंदी आणि मराठी या दोन्ही भाषेतील छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाने छाप सोडली आहे. काही दिवसांपूर्वी ‘बिग बॉस’च्या दहाव्या पर्वाची विजेती ठरलेली मराठमोळी टीव्ही अभिनेत्री शिल्पा शिंदेने काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. यानंतर आता आसावरी जोशी यादेखील काँग्रेसमध्ये सामील होणार आहेत. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या उपस्थितीत आसावरी जोशी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.

आसावरी यांनी ऑफिस-ऑफिस या प्रसिद्ध मालिकेत काम केले असून मला सासू हवी या मराठी मालिकेत काम केले आहेत. आसावरी जोशी आणि शिल्पा शिंदे या दोघींनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेस प्रवेश करत असल्यामुळे त्या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार, की स्टार प्रचारक होणार, हे येत्या काळात समजेल. मात्र काँग्रेस तिच्या लोकप्रियतेचा लाभ करुन घेणार, यात शंका नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“भाजपचा ताणतणाव कमी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी केलंय ‘ते’ वक्तव्य”-नाना पटोले

News Desk

राजस्थानमध्ये काँग्रेस सत्तेत आल्यानंतर १० दिवसात शेतकऱ्यांचे कर्जमाफ

News Desk

भुजबळांच्या टोल्याला उद्धव ठाकरेंचे प्रत्युत्तर

Gauri Tilekar