HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर निवडणुकीच्या रिंगणात ?

मुंबई | अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. काँग्रेसकडून उर्मिला उमेदवारी मिळण्याच शक्यता वर्तवली जात आहे. उत्तर मुंबईमधून उमेदवारी मिळाणार  भाजपचे उमेदवार गोपाल शेट्टी यांच्याविरोधाक लोकसभा निवडणूक लढविणार असल्याची माहिती मिळाली आहे. शेट्टी यांना २०१४मध्ये झालेल्या निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने विजय मिळाला होता.

उत्तर मुंबई मतदारसंघात उत्तर भारतीय आणि गुजराती या मतदारांची संख्या मोठी आहे. शेट्टी यांच्या विरोधात काँग्रेसने ग्लॅमरस चेहऱ्याचा शोध सुरू असून सर्वात आधी अभिनेत्री आसावरी जोशी आणि शिल्पा शिंदे या दोघींच्या नावाची चर्चा रंगली होती. परंतु ऊर्मिला मातोंडकरला उमदेवारी मिळणार असल्याचे माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

 

Related posts

‘मढ्यावरचे लोणी खाणे’ म्हणजे काय हे गोव्यातील आजचे राजकारण पाहता समजून येईल | ठाकरे

News Desk

RamMandir : उद्धव ठाकरे ‘लक्ष्मण किला’ येथे पोहोचले

News Desk

राष्ट्रवादीच्या पुण्यातल्या सभेत भुजबळ रहाणार उपस्थित

News Desk