HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

अडवाणी हे आमचे प्रेरणास्रोत, पक्षातील प्रत्येकाच्या मनात त्यांच्याबद्दल आदर !

नवी दिल्ली | “लालकृष्ण अडवाणी यांचे तिकीट कापलेले नाही. मात्र, त्यांचे वाढते वय आणि प्रकृतीच्या कारणांमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. अडवाणी हे आमचे प्रेरणास्रोत आहेत. पक्षातील प्रत्येकाच्या मनात त्यांच्याबद्दल आदर आहे”, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. आगामी लोकसभा निवडणुकांसाठी भाजपने गुरुवारी (२१ मार्च) आपली पहिली उमेदवार यादी जाहीर केली. यात भाजपच्या एकूण १८४ उमेदवारांच्या नावांचा समावेश होता. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचा बालेकिल्ला असणाऱ्या गांधीनगरमधून उमेदवारी दिल्याने विरोधी पक्षाकडून भाजपवर प्रचंड टीका होत आहे.

“अटलजी आणि अडवाणी हे आमचे प्रेरणास्रोत आहेत. पक्ष कोणताही असो त्यात बदल होतच असते. त्यांना तिकीट न देण्याचा आणि त्यांच्या पक्षातील योगदानाचा एकमेकांशी संबंध लावला जाऊ शकत नाही. पक्षातील प्रत्येकाच्या मनात त्यांच्याबद्दल आदर आहे”, असेही गडकरी यावेळी म्हणाले. भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुन्हा वाराणसीतून, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह लखनौ तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नितीन गडकरी नागपूरमधून तर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना गांधीनगरमधून उमेदवारी देण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर आता विरोधी पक्षांकडून भाजपवर निशाणा साधण्यात येत आहे.

जर पंतप्रधान मोदी पक्षातील ज्येष्ठांचा आदर करीत नाहीत तर जनतेच्या विश्वासाचा आदर काय करणार ?, असा टोला आता काँग्रेसकडून लागवण्यात आला आहे. “पहिल्यांदा लालकृष्ण अडवाणी यांना जबरदस्तीने मार्गदर्शक मंडळात पाठवले आणि आता त्यांची संसदीय जागा देखील त्यांच्याकडून काढून घेतली. जर पंतप्रधान मोदी पक्षातील ज्येष्ठांचा आदर करीत नाहीत तर जनतेच्या विश्वासाचा आदर काय करणार ? भाजप भगाओ, देश बचाओ”, असे काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

Related posts

 नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी | कमल हसन

News Desk

मनोहर पर्रीकर यांच्यावर आज संध्याकाळी पणजीमध्ये होणार अंत्यसंस्कार

News Desk

लोकसभा निवडणुकीचे बिगूल वाजले, आजपासून देशभरात आचारसंहिता लागू

News Desk