HW News Marathi
राजकारण

आधी स्वतःच घर सांभाळा, त्यानंतर देश सांभाळा !

नागपूर | “आधी स्वतःच घर, कुटुंब सांभाळा. मग देश सांभाळा”, असा सल्ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिला आहे. भाजपसाठी काम करण्यास कार्यकर्त्यांसाठी गडकरींनी सल्ला दिला आहे.नागपूर येथे शनिवारी (२ फेब्रुवारी) अभाविपच्या जुन्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आले होते. यावेळी नितीन गडकरी बोलत होते.

“भाजपसाठी, देशासाठी आपले संपूर्ण आयुष्य देण्यास तयार असणारे खूप लोक भेटतात. परंतु त्यांनी आधी आपले घर, कुटुंब सांभाळावं. कारण जे आपलं घर सांभाळू शकत नाहीत ते देश देखील सांभाळू शकत नाहीत. त्यामुळे आधी आपलं घर, मुलंबाळं सांभाळा आणि त्यानंतर भाजप किंवा देशाचं काम करा’, असा सल्ला गडकरींनी यावेळी कार्यकर्त्यांना दिला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बारामतीच्या नेत्याचा मी बंदोबस्त करणार !

News Desk

भाजपचा जाहीरनामा बंद खोलीत तयार केला !

News Desk

रथयात्रेमध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना रथाखाली चिरडू !

Gauri Tilekar