नवी दिल्ली | “अकबर हा महिलांच्या वेशात मीनाबाजारात जायचा. तिथल्या महिलांची छेड काढायचा”, असे वादग्रस्त वक्तव्य भाजपचे राजस्थानचे प्रदेशाध्यक्ष मदनलाल सैनी यांनी केले आहे. भाजपच्या नेत्यांनी आपली वादग्रस्त वक्तव्यांची मालिका अद्याप कायम ठेवली आहे. जयपूर येथील भाजपच्या मुख्यालयात महाराणा प्रताप जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात सैनी यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले आहे.
Madan Lal Saini, Rajasthan BJP Chief in Jaipur: Akbar had set up Meena bazaar, women used to do all the work there, men weren't allowed. The way Akbar used to go there in disguise & do misdeeds, it is recorded in history. (6.6.19) pic.twitter.com/O8rgBVdhvA
— ANI (@ANI) June 7, 2019
“कोणत्याही व्यक्तीची महानता ही त्याच्या चारित्र्यावरून समजते. अकबर हा महिलांच्या वेशात मीना बाजारात जायचा. तिथे जाऊन महिलांची छेड काढायचा”, असे सैनी म्हणाले. काँग्रेसकडून सैनी यांच्या या वक्तव्याचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे. “सैनी यांनी ज्या प्रकारची भावना व्यक्त केली आहे, ती अत्यंत निंदनीय आहे”, अशा शब्दात काँग्रेसच्या प्रवक्त्या अर्चना शर्मा यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.