HW News Marathi
राजकारण

राम कदम यांना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा घरचा आहेर…

मुंबई | भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते, घाटकोपरचे आमदार राम कदम यांनी दहीकाला उत्सवादरम्यान “उद्या मला सांगितलेत की एखाद्या मुलीला प्रपोज केले आहे ती नाही म्हणते. तुमच्या आई वडिलांना समोर आणा ते जर म्हटले की मुलगी पसंत आहे तर तिला पळवून आणेन” असे चुकीचे वक्तव्य मुलीसंदर्भात केलेले होते.

राम कदम यांच्या या वक्तव्यावर अनेक स्तरातून त्यांच्यावर टीका करण्यात आली. या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे तर्फे राम कदम यांच्या विरोधात घाटकोपर येथील रामनिरंजन झुंझुणवाला कॉलेजच्या बाहेर निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी राम कदम यांच्या फोटोला काळी शाई फासली, घोषणा बाजी करत राम कदम यांच्या राजीनाम्याची मागणी केली .

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पोलिसांनी पुरेशी सुरक्षा व्यवस्था न पुरविल्यामुळे हे घडले !

News Desk

पावसाळी अधिवेशनाच्या तारखेत बदल; ‘या’ तारखेला अधिवेशन होण्याची शक्यता

Aprna

राज्याच्या सत्तांतरावर शिंदे गटाच्या वकिलांनी ‘या’ केसचा दिला हवाला

Aprna