नवी दिल्ली | अखिल भारतीय हिंदू महासभेची अधिकृत वेबसाइट आज (३१ जानेवारी) हॅक करण्यात आली आहे. महात्मा गांधींच्या पुण्यतिथीला हिंदू महासभेकडून महात्मा गांधींच्या प्रतिमेवर गोळ्या झाडून इतिहास पुन्हा जिवंत करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे “केरला सायबर वॉरिअर्स”कडून अखिल भारतीय हिंदू महासभेची वेबसाईट हॅक करण्यात आली आहे. या वेबसाईटवर ‘हिंदू महासभा मुर्दाबाद’ असे लिहिण्यात आले आहे.
India: Hindu fascists (Hindu Mahasabha) celebrate the assassination of Gandhi by shooting his effigy and honoring his Hindu fascist killer yesterday. pic.twitter.com/9LDeNd41LP
— CJ Werleman (@cjwerleman) January 30, 2019
उत्तर प्रदेशातील अलीगड येथे महात्मा गांधींच्या पुण्यतिथी दिवशी बुधवारी (३० जानेवारी) हिंदू महासभेच्या नेत्या पूजा पांडेय यांनी गांधींच्या प्रतिमेवर गोळ्या झाडून त्यांच्या प्रतिमेचे दहन केले. इतकेच नव्हे तर यावेळी नथुराम गोडसेच्या छायाचित्राला हार अर्पण करून मिठाई वाटत ‘महात्मा नथुराम गोडसे अमर रहे’ च्या घोषणाही देण्यात आला.
“महात्मा गांधी यांना राष्ट्रपिता म्हणणे अयोग्य आहे. जर मी नथुराम गोडसेच्या आधी जन्मले असते, तर मीच महात्मा गांधी यांची हत्या केली असती”,असे वादग्रस्त वक्तव्य देखील पूजा पांडेयने केले. दरम्यान, या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणी पूजा पांडेयसह १३ जणांविरोधात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.