HW News Marathi
राजकारण

शिवसेनेला कॉँग्रेसकडून युतीची आॅफर

मुंबई | भाजपसोबत सत्तेत सहभागी राहून सतत विरोधी पक्षाच्या भूमिकेत वावरणाºया शिवसेनेला कॉँग्रेसने हात देण्याचा प्रयत्न केला आहे. शिवसेनेला कॉँग्रेससोबत येण्याची इच्छा असेल तर त्यांनी थेट हायकमांडशी संपर्क साधावा, असे वक्तव्य माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले आहे. गेल्या काही दिवसांपासून कॉँग्रेस-शिवसेनेचे अनेक ठिकाणी साटेलोटे असल्याची बाब चर्चेत होती. आता तिच्यावर उघडपणे चर्चा सुरू झाली आहे. दोन्ही पक्ष एकत्र आल्यास भाजपला शह देता येतो, याचे उदाहरण नांदेड महापालिका निवडणुकीत राज्याने पाहिले आहे. तसेच मुंबई महापालिका निवडणुकीतही कॉँग्रेस-शिवसेनेने हातमिळवणी केल्याचेही सांगितले जात होते. त्याचा पुढचा अध्याय चव्हाण यांच्या आॅफरमुळे सुरू झाल्याचे बोलले जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री मदनलाल खुराना यांचे निधन

swarit

#MarathaReservation : काँग्रेस-राष्ट्रवादीने आरक्षणाचा मुद्दा चुकीच्या पध्दतीने हातळला !

News Desk

मोदी सरकारच्या नोटाबंदी-जीएसटीमुळे देशात आर्थिक मंदी !

News Desk