HW News Marathi
राजकारण

ममाताजी, ‘जय श्रीराम’ची घोषणा पाकिस्तानमध्ये द्यायची का ?

नवी दिल्ली | “पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींचा प्रभू श्रीरामाचा जयघोष करण्यावर आक्षेप आहे. ममाताजी, ‘जय श्रीराम’ची घोषणा काय पाकिस्तानमध्ये द्यायची का ?”, असा टोला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी यांना लगावला आहे. गेले अनेक दिवस ममता बॅनर्जी या भाजपविरोधी अत्यंत आक्रमक भूमिका घेत आहेत. पश्चिम बंगाल सरकारकडून भाजप नेत्यांच्या प्रचारसभांना अनेकदा परवानगी देखील नाकारण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, ‘फनी’ चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर देखील ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान मोदींचा समाचार घेतला आहे.

“देशात विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवली जाते. मात्र, तृणमूल काँग्रेस लोकशाहीचे खच्चीकरण करण्यासाठी निवडणूक लढवत आहे. पश्चिम बंगालमधील पंचायत निवडणुकांमध्ये ६० पेक्षा जास्त भाजपा कार्यकर्त्यांची हत्या झाली. मात्र, ही पंचायत नव्हे तर लोकसभेची निवडणूक आहे. त्यामुळे जनतेने न घाबरता मतदान करावे”, असे आवाहन अमित शाह यांनी त्यांच्या पश्चिम बंगालमधील सभेत मतदारांना केले आहे.

ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान मोदींवर कठोर शब्दात टीका केली आहे. पश्‍चिम बंगालमध्ये फनी चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासंबंधी पंतप्रधान नरेंद्र मोदी ममता बॅनर्जी यांच्या समवेत आढावा बैठक घेऊ इच्छित होते. मात्र, ‘‘मी मोदींना देशाचा पंतप्रधान मानत नाही, त्यामुळे मी त्यांच्या कोणत्या बैठकीत सहभागी झाले नाही. मी त्यांच्यासोबत एका मंचावरही उपस्थित राहू इच्छित नाही. मी येणाऱ्या पंतप्रधानांशी वादाळासंदर्भात चर्चा करेन. वादळामुळे होणाऱ्या नुकसानापासून वाचण्यासाठी आम्ही समर्थ आहोत. निवडणुकीपूर्वी आम्हाला केंद्राच्या मदतीची गरज नाही,’’ असे म्हणत ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भावना गवळी यांचे घटस्फोटीत पती प्रशांत सुर्वे यांचा शिवसेनेत प्रवेश

Aprna

दुसऱ्याच दिवशी अधिवेशनाचे कामकाज तहकूब

News Desk

#MarathaReservation : हा तर माझाच विजय | राणे

News Desk