नवी दिल्ली | पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या नोटाबंदीदरम्यान जुन्या नोटा जिल्हा सहकारी बँकेत जमा करण्याबाबत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांच्यावर आरोप केला आहे. अमित शाह संचालक असलेल्या अहमदाबाद सहकारी बँकेत सर्वाधिक जुन्या नोटा जमा झाल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे. महत्वाचे म्हणजे सदर माहिती आरटीआयअंतर्गत प्राप्त झाल्याचे काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी स्पष्ट केले आहे.
गेल्या काही दिवसात कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींना अनेकदा टिकेचे लक्ष केले होते. परंतु नोटबंदीच्या या प्रकरणानंतर कॉंग्रेस अध्यक्षांनी आपला मोर्चा भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांकडे वळविल्याचे पहायला मिळत आहे. सदर प्रकरणावरुन काँग्रेस अध्यक्षांनी अमित शाहांवर टीका करण्याची संधी सोडली नाही. भाजपचे नेते अनेकदा राहुल गांधींना ‘शहजादा’ म्हणून टोमणे मारतात. तोच आधार घेत राहुल गांधींनी ‘शाह ज्यादा खा गया, असा हॅशटॅग वापरुन अमित शहा यांना टिकेचे लक्ष केले आहे.
Congratulations Amit Shah ji , Director, Ahmedabad Dist. Cooperative Bank, on your bank winning 1st prize in the conversion of old notes to new race. 750 Cr in 5 days!
Millions of Indians whose lives were destroyed by Demonetisation, salute your achievement. #ShahZyadaKhaGaya pic.twitter.com/rf1QaGmzxV
— Rahul Gandhi (@RahulGandhi) June 22, 2018
“अभिनंदन, अमित शाह जी, संचालक, अहमदाबाद जिल्हा सरकारी बँक, तुमच्या बँकेने जुन्या नोटा बदलण्याच्या बाबतीत पहिला पुरस्कार जिंकला आहे. पाच दिवसात 750 कोटी! लाखो भारतीयांचे आयुष्य नोटाबंदीमुळे उद्ध्वस्त झाले, तुमच्या या कामगिरीला सलाम,” असे ट्वीट राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर हॅंडलवरुन करत शहा यांना लक्ष केल्याचे पहायला मिळत आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.