नवी दिल्ली | संसदेच्या पावसाळी अधिवेशना सुरू असून यावेळी लोकसभा सभागृहात आज (१५ जुलै) गृहमंत्री अमित शहा आणि एमआयएमचे खासदार असुदुद्दीन औवेसी यांच्यात खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी राष्ट्रीय सुरक्षा एजन्सीला मजबूत करण्याचे विधेयक सभागृत संमत करण्यात आले. सभागृहात चर्चेदरम्यान सरकारतर्फे सत्यपाल सिंह बाजू मांडत होते. त्यावेळी, औवेसींनी सत्यपालसिंह यांच्या भाषणादरम्यान गोंधळ घालण्यास सुरुवात केला. तसेच औवेसी यांनी सत्यपालसिंह यांचे भाषण थांबविण्याचा प्रयत्न केला.
#WATCH: Union Home Minister Amit Shah says in Lok Sabha,"sunne ki bhi aadat daliye Owaisi Sahab, iss tarah se nahi chalega." Shah said this after AIMIM MP Asaduddin Owaisi objected to a part of BJP MP Satya Pal Singh's speech during discussion on NIA Amendment Bill. pic.twitter.com/QsbwsqYcKp
— ANI (@ANI) July 15, 2019
हैदराबाद बॉम्बस्फोट प्रकरणी पोलिसांनी काही संशयित म्हणून अल्पसंख्यांक समुदायाच्या नागरिकांना ताब्यात घेतले. त्यावेळी, चक्क मुख्यमंत्र्यांनी तसे न करण्याचे आदेश दिले. विशेष म्हणजे पोलीस आयुक्तांना नोकरीवरुन काढून टाकण्यापर्यंतही सुनावण्यात आल्याचे सत्यपालसिंह यांनी म्हटले होते. यावर औवेसी यांनी सभागृहात आक्षेप घेत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. यानंतर ओवैसींना गप्प करत औवेसी साहब सुनने की, “ताकद रखिए, जब ए राजा बोल रहे थे तब आप क्यों नही खडे हुए, एैसे नही चलेगा, आपको सुनना भी पडेगा..”, असे म्हणत अमित शहा यांनी औवेसींना खडेबोल सुनावले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.