HW News Marathi
राजकारण

अमित शहांचे शिवसेनेला अल्टिमेटम

मुंबई | सत्तेत राहून डोक्यावर बसून तुमची (जनतेची) कामे करुन घेता येतात, असे वक्तव्य करणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आता काहीसे अडचणीत आले आहेत. भाजपसोबत केंद्र आणि राज्यात सत्तेत राहून भाजपवरच टीका करणाऱ्या शिवसेनेला आज भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी अल्टिमेटम दिल्याची माहिती मिळत आहे. ‘सत्तेला कधीही लाथ मारू’ असे म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंना याबाबत आता अंतिम निर्णय घ्यावा लागणार आहे. “अन्यथा आम्ही लोकसभा निवडणुकीसह विधानसभेची निवडणूक घेऊ”, असा इशारा अमित शहांकडून देण्यात आला आहे. एबीपी माझा या मराठी वृत्तवाहिनीने हे वृत्त प्रसारित केले आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आता यावर नेमके काय उत्तर देणार यावर संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे. दरम्यान, शिवसेनेवर दबाव आणण्यासाठी हा भाजपचा डाव असल्याचे देखील म्हटले जात आहे. “जर शिवसेनेने युतीबाबत आताच काही स्पष्ट भूमिका घेतली नाही, तर राज्यातील विधानसभा बरखास्त करून लोकसभेच्या निवडणुकीबरोबरच राज्यातील विधानसभेच्या निवडणुकाही घेतल्या जातील”, असा इशारा अमित शाह यांनी सेनेला दिला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#21daysLockdown | देशातील कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी १५ हजार कोटींची तरतूद

News Desk

अडवाणी हे आमचे प्रेरणास्रोत, पक्षातील प्रत्येकाच्या मनात त्यांच्याबद्दल आदर !

News Desk

दिल्लीचे कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अजय माकन यांचा राजीनामा

News Desk