HW News Marathi
राजकारण

युतीसाठी अमित शहांचे ‘मातोश्री’च्या दिशेने एक पाऊल पुढे

मुंबई | देशात काही राज्यात नुकत्याच निवडणुका पार पडल्या आहेत. या निवडणुकीत भाजपला स्पष्ट असे बहुमत मिळविता आले नाही. त्यामुळे त्यांना सत्ता स्थापनेसाठी दुसऱ्या पक्षांची गरज लागली होती. एकदरीत ही सर्व परिस्थिती पाहता भाजपला २०१९ची लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी मित्र पक्षांची गरज लागणार आहे. त्यामुळे भाजप त्यांच्या रुसलेल्या मित्र पक्षाचा रुसवा काढण्याची मोहिम सुरू केल्याचे चित्र दिसत आहे.

नुकतेच पालघरमध्ये लोकसभा पोटनिडणूक पार पडली आहे. या निवडणुकीत शिवसेनेचा फार कमी मतांनी पराभव स्वकारावा लागला होता. या पराभवानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी सेना भवनात पत्रकार परिषद घेऊन सेना आगामी निवडणुका स्वबळावर लढणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे सेना-भाजप युती अशक्य असल्याचे चिन्हे दिसू लागल्यानंतर भाजपमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा बुधवारी ६ जून रोजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेट घेऊन युतीवर चर्चा करणार आहेत.

सध्या मुंबईत भाजपचे संपर्क अभियान सुरु आहे. या संपर्क अभियाना अंतर्गत अमित शहा मुंबईचा दौर करणार आहेत. या दौऱ्या निमित्ताने अमित शहा बुधवारी सायंकाळी ७ वाजता उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी मातोश्रीवर ही भेट घेणार आहेत. या भेटीत नेमके काय घडेल याकडे सर्व महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

तसेच नुकत्याच पार पडलेल्या पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत भाजप आणि शिवसेना यांच्यात पडलेली दरी किती खोल आहे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ऑडिओ क्लिप पालघरच्या जाहीर सभेत सादर केल्यानंतर यांचे स्पष्ट चित्रच दिसून आले. या ऑडिओ क्लिपमध्ये साम-धाम-दंड-भेद या कुट नीतीचा वापर करुन पालघर निवडणूक जिंकण्याचे आदेश फडणवीस यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना दिले होते. यावर महाराष्ट्राचे राजकारण चांगलेच तापले होते. आता अमित शहा यांच्या भेटीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात काय बदल होईल हे पाहणे औसुक्याचे ठरेल.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी महिला व बालविकास विभागाचा घेतला आढावा

Aprna

आगामी निवडणुकीत स्त्री हट्ट फडणवीसांना भोवणार का ?

News Desk

पुलवामा दहशतवादी हल्ला हा गोध्रा हत्याकांडासारखाच भाजपचा पूर्वनियोजित कट !

News Desk