नवी दिल्ली | कंपास पेटीच्या साहाय्याने एका ८ वर्षाच्या मुलीचा राफेल विमान खरेदी करार नेमका काय आहे ? हे समजावून सांगणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी या मुलीचे आभार मानत आपल्या ट्विटर हँडलवरून या मुलीचा व्हिडीओ ट्विट केला आहे. निर्मला सीतारामन यांच्या या ट्विटमुळे राफेलचा मुद्दा वेगळ्या पद्धतीने पुन्हा चर्चेत आला आहे.
Thanks for posting this. My special thanks to this smart young lady (dear child, if affection permitted) for taking interest in the matter of fighter aircraft #Rafale. My good wishes for her to fly one of them as a trained fighter pilot of the @IAF_MCC @DefenceMinIndia https://t.co/fsteyBIw1U
— Nirmala Sitharaman (@nsitharaman) January 10, 2019
एका कंपास पेटीच्या साहाय्याने या मुलीने राफेल विमान खरेदी करार समजावून सांगितला आहे. “मी राफेलचा मुद्दा सोप्या शब्दात समजावते. ही पहिली कंपास पेटी (जुना राफेल करार) राहुल गांधींची आहे. जी रिकामी असून तिची किंमत ७२० कोटी रुपये इतकी आहे . दुसरी कंपास पेटी (नवा राफेल करार) मोदीजींची आहे. जी अत्याधुनिक शस्त्रास्त्रांनी सज्ज असून तिची किंमत 1600 कोटी रुपये एवढी आहे. एक गोष्ट राहुल गांधींच्या लक्षात येत नाही कि, ते ज्या राफेलच्या किंमतींबाबत सांगत आहेत ती केवळ विमानाची किंमत आहे. तर मोदीजींची विमानं शस्त्रास्त्र सज्ज आहेत,’ असे या मुलीने तिच्या व्हिडीओमध्ये म्हटले आहे.
तुम्ही एक दिवस हवाई दलात वैमानिक व्हाल !
‘तुम्ही राफेल करारात जो रस घेतलात, त्यासाठी मी तुमचे आभार मानते. माझ्या शुभेच्छा तुमच्यासोबत आहेत. तुम्ही एक दिवस हवाई दलात वैमानिक व्हाल,’ असे म्हणत संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी या व्हिडीओसाठी या मुलीचे कौतुक करत तिचे आभारही मानले आहेत. या मुलीचा हा व्हिडीओ ‘एक भारत-श्रेष्ठ भारत’ नावाच्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला होता. हा व्हिडीओ निर्मला सीतारामन यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर शेअर केला.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.