HW News Marathi
राजकारण

पायल रोहतगी हिचा माफीनामा म्हणजे नाटक !

मुंबई | अभिनेत्री पायल रोहतगीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह मजकूर ट्वीट केल्यानंतर सर्व स्तरातून तिच्यावर टीका होत होती. यानंतर पायलने फेसबुकवर माफी मागत भारतात अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही, असे व्हिडिओमध्ये म्हणाली आहे. परंतु, पायलचे माफीनामा म्हणजे हे नाटक असून जोपर्यंत याचा सूत्रधार कोण याचा शोध लागत नाही. तिच्यावर गुन्हा दाखल करून अटक होत नाही. तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिला आहे.

पायल महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह मजकूर सोशल मिडियावर टाकून छत्रपतींचा अवमान केला होता. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. पायल काल (३ जून) पायल हिच्यावर गुन्हा दाखल करुन अटक करण्याची मागणी नवाब मलिक यांनी केली होती. यानंतर संध्याकाळी युवक काँग्रेसच्यावतीने पोलिसांना निवेदन देत तिच्या अटकेची मागणी करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आक्रमक पवित्र्यानंतर पायल हिने माफी मागितली. तरी देखील राष्ट्रवादी काँग्रेस समाधानी नसून तिच्यावर गुन्हा दाखल करुन अटक करण्याची मागणी केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्रातील सत्तांतरावर सर्वोच्च न्यायालयात आज सुरू; पाच सदस्यीय घटनापीठासमोर होणार सुनावणी

Aprna

धमकी आली हा म्हाडाच्या अध्यक्षांचा डाव !

News Desk

मानहानी प्रकरण: राहुल गांधींना जामीन मंजूर; पुढील सुनावणी 13 एप्रिलला होणार

Aprna