मुंबई | अंधेरी पूर्व विधानसभेची पोटनिवडणूक (Andheri East Assembly By-Election) जाहीर झाली आहे. या विधनासभेची पोटनिवडणूक 3 नोव्हेंबरला मतदान होणार असून 6 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. तर या विधानसभा पोटनिवडणुकीसाठी 14 ऑक्टोबरपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत. तसेच 17 ऑक्टोंबरला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. राज्यातील सत्तांतरानंतरची ही पहिली विधानसभा पोटनिवडणूक आहे. निवडणूक आयोगाने विधानसभा पोटनिवडणूक जाहीर केली. परंतु, या पोटनिवडणुकीत शिवसेनेना (Shiv Sena) आणि शिंदे गट (Shinde Group) कोणत्या चिन्हांवर निवडणूक लढवणार, यावर सस्पेन्स वाढला आहे.
शिवसेनेचे अंधेरी पूर्व विधानसभेचे आमदार रमेश लटके (Ramesh Latke) यांच्या निधनानंतर येथे पोटनिवडणूक होणार आहे. लटकेंचे 11 मे रोजी दुबईत निधन झाले होते. लटकेंच्या निधनानंतर शिवसेनेकडून रमेश लटके यांची पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्याची माहिती मिळाली आहे. या मतदारसंघात शिंदे गटाने उमेदवार देणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. परंतु, शिंदे गटा ऐवजी भाजपने अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत मुरजी पटेल यांना उमेदवार असणार आहे.
या पोटनिवडणुकीत शिंदेच्या बंडानंतर ठाकरे विरूद्ध शिंदे ही लढाई होणार आहे. तर ठाकरे विरूद्ध शिंदे लढाईची ही पहिली पोटनिवडणूक असेल. नियमानुसार, सहा महिन्यात निवडणूक जाहीर होणे हे बंधनकारक असते. त्यामुळे 11 नोव्हेंबरच्या आधी ही पोटनिवडणूक अपेक्षित होते. निवडणूक ही 30 ते 40 दिवस आधी जाहीर होत असते. कारण उमेदवारांना प्रचार करण्यासाठी वेळ मिळावा.
निवडणूक आयोग चिन्ह गोठवणार का?
या पोटनिवडणुकीत धनुष्यबाण कोणाला मिळणार हे महत्वाचे आहे. कारण निवडणूक आयोगातील ठाकरे गट आणि शिंदे गट यांची लढाई अजून सुरू देखील झालेली नाही. एका बाजूची कागदेपत्रे दाखल झाले आहेत. हे चिन्हा कोणाला देणार, यासंदर्भातील निर्णय निवडणूक आयोग कसा घेणार, हे पहावे लागेल. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने निवडणूक आयोगाला मुभा मिळाली असली तरी, ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडे अद्याप आपली कागदपत्रे सादर केलेली नाही. याआधी शिंदे गटाची कागदपत्रे आम्हाला मिळावी, मग आमची कागदपत्रे सादर करू, अशी मागणी ठाकरे गटाने केली आहे. यामुळे ही पोटनिवडणूक दोन्ही गटासाठी महत्वाची ठरणार आहेत. ज्यावेळी निवडणूक जवळ असते, त्यावेळी निवडणूक आयोग अनेकदा वादातील चिन्हे गोठवून ठाकते. आणि दोन्ही बाजूना नवीन चिन्हे देत असते. मग आता शिंदे-ठाकरेंच्या केसमध्ये निवडणूक आयोग चिन्ह गोठवणार का?, शिवसेनेच्या ठाकरे गटाचे म्हणण्यानुसार, अजूनही केस आयोगासमोर सुरू झालेली नाही. त्यामुळे आमचे म्हणजे शिवसेनेचे चिन्हे त्यांच्याकडे राहिले पाहिजे, शिवसेनेचा हा दावा आयोगामध्ये योग्य ठरतोय का ते बघावे लागेल.
संबंधित बातम्या
अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत भाजप किंवा शिंदे गटापैकी कोण निवडणूक लढवणार?
शिवसेनेचे अंधेरी पूर्वचे आमदार रमेश लटके यांचे दुबईत निधन
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.