HW News Marathi
राजकारण

केंद्राच्या कामगारविरोधी धोरणाविरोधात अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे आंदोलन

मुंबई | देशातील असंघटित क्षेत्रातील कामगार कर्मचाऱ्यांच्या केंद्राच्या कामगारविरोधी धोरणाविरोधात केंद्रीय कामगार संघटनांनी कालपासून (८ जानेवारी) संप पुकारला आहे. या संपाचा आज दुसरा दिवस आहे. यात सर्व अंगणवाडी कर्मचारी सहभागी असून सरकारच्या कामगारविरोधी धोरणाचा आम्ही जाहीर निषेध करण्यासाठी हा संप आहे, असे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी माया परमेश्वर यांनी सांगितले आहे. या संपात महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून अंगणवाडी सेविका आणि शिक्षिका आपल्या मागण्यांसाठी आझाद मैदानात आले आहेत. सरकार प्रत्येक वेळी आंदोलनास अंगणवाडी कर्मचाऱ्यांना त्यांच्या असलेल्या मागण्यांविषयी आश्वासन देते .परंतु त्याची अंमलबजावणी करत नाही .त्यामुळे हा आज देशव्यापी संप आहे, असे माया परमेश्वर यांनी सांगितले.

अंगणवाडी कर्मचार्‍यांच्या प्रलंबित मागण्या :

१) सातव्या आयोगाच्या शिफारशीनुसार अंगणवाडी कर्मचार्‍यांना दरमहा १८,००० रुपये वेतन देण्यात यावे

२) केंद्र शासनाने जाहीर केलेले अंगणवाडी सेविका १५०० रुपये मिनी अंगणवाडी सेविका १२५० मदतनीस ७५० मानधन वाढ त्वरित लागू करावी.

३) अंगणवाडी कर्मचारी सर्व करीत असलेल्या कामाचे ८ तास मोजून त्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन त्यांचे सर्व लाभ देण्यात यावे

अंगणवाडी सेविका इत्यादी मागण्यांसाठी पुन्हा आझाद मैदानात आल्‍या आहेत. राज्य शासन त्यांच्या या मागण्यांकडे कानाडोळा करीत असून कर्मचाऱ्यांना वेळोवेळी आश्वासन देऊन झुलवत ठेवत आहे. याचा महाराष्ट्रभरातील सर्व अंगणवाडी कर्मचारी निषेध करीत आहेत. शासनाने या सर्व मागण्या त्वरित सोडावे अशी आम्ही शासनाला विनंती करीत आहोत, असे अंगणवाडी कर्मचार्‍यांनी सांगितले. अन्यथा यापुढे तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा त्यांनी यावेळी केलेल्या आंदोलनात दिला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा : अजित पवारांवर गुन्हा दाखल

News Desk

#LokSabhaElections2019 : आता दररोज एक एक घराणे भाजपमध्ये येईल !

News Desk

आज युतीच्या प्रचाराचा नारळ फुटणार

News Desk