HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

काँग्रेसचे नाराज आमदार अब्दुल सत्तार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

मुंबई | काँग्रेसने औरंगाबादमधून सुभाष झांबड यांना लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी दिल्याने नाराज नेते अब्दुल सत्तार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काल (२३ मार्च) मध्यरात्री भेट घेतली आहे. या भेटीनंतर काँग्रेसचा आणखील एक नेता भाजपच्या गळाला लागल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. सत्तार यांच्या भेटीवेळी मुख्यमंत्र्यांसह जलसंपदा मंत्री गिरीश महाजन उपस्थित होते.

लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने महाराष्ट्रातील जाहीर केलेल्या यादीत औरंगाबादसह ५ मतदारसंघातील उमेदवारांचा समावेश आहे. औरंगाबादमधीन सुभाष झांबड यांना उमेदवारी देण्यात आल्यानंतर सत्तार यांनी पक्षाविरोधात बंड केले. सत्तार औरंगाबादमधून लोकसभा निवडणूक लढवण्यास उत्सुक होते. परंतु तिकीट न मिळाल्याने त्यांनी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. आपण अपक्ष निवडणूक लढवणार असल्याची घोषणा सत्तार यांनी केली आहे. औरंगाबादमधून शिवसेनेचे चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

Related posts

राहुल गांधींचा अर्ज दाखल, वायनाडमध्ये काँग्रेसचे जोरदार शक्ती प्रदर्शन

News Desk

मोदी विरोधी राज्यांच्या सरकारबरोबर पाकिस्तानच्या पंतप्रधानांसारखे वागतात | केजरीवाल

News Desk

राष्ट्रवादी करणार १८ नगरसेवकांवर कारवाई

News Desk