HW News Marathi
राजकारण

काँग्रेसचे नाराज आमदार अब्दुल सत्तार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

मुंबई | काँग्रेसने औरंगाबादमधून सुभाष झांबड यांना लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी दिल्याने नाराज नेते अब्दुल सत्तार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काल (२३ मार्च) मध्यरात्री भेट घेतली आहे. या भेटीनंतर काँग्रेसचा आणखील एक नेता भाजपच्या गळाला लागल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. सत्तार यांच्या भेटीवेळी मुख्यमंत्र्यांसह जलसंपदा मंत्री गिरीश महाजन उपस्थित होते.

लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने महाराष्ट्रातील जाहीर केलेल्या यादीत औरंगाबादसह ५ मतदारसंघातील उमेदवारांचा समावेश आहे. औरंगाबादमधीन सुभाष झांबड यांना उमेदवारी देण्यात आल्यानंतर सत्तार यांनी पक्षाविरोधात बंड केले. सत्तार औरंगाबादमधून लोकसभा निवडणूक लढवण्यास उत्सुक होते. परंतु तिकीट न मिळाल्याने त्यांनी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. आपण अपक्ष निवडणूक लढवणार असल्याची घोषणा सत्तार यांनी केली आहे. औरंगाबादमधून शिवसेनेचे चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नायर हॉस्पिटलसमोर डॉ. पायल तडवी यांच्या कुटुंबियांकडून निदर्शने

News Desk

राज्यातील विकासकामे गुजरात, कर्नाटकची आहेत का? अजित पवारांचा ‘ईडी’ सरकारला संतप्त सवाल…

Aprna

काँग्रेसला ४० पेक्षा अधिक जागा मिळाल्या तर मोदी स्वत:ला फाशी लावून घेणार का?

News Desk