HW News Marathi
राजकारण

सांगली, जळगावच्या महापालिका निवडणुकांची तारीख जाहीर

मुंबई | सांगली-मिरज-कुपवाड व जळगाव महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. तसेच वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या एका रिक्तपदाच्या पोटनिवडणुकीसाठी 1 ऑगस्ट रोजी मतदान घेण्यात येणार आहे. तर 3 ऑगस्ट रोजी मतमोजणी होणार आहे.

ज्या ठिकाणी मतदान होणार आहे. त्याठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू करण्यात आल्याची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी केली आहे. सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेची मुदत 13 ऑगस्ट 2018 रोजी संपत आहे.

  • उमेदवारी अर्ज दाखल दाखल करण्याची मुदत : 4 ते 11 जुलै 2018
  • उमेदवारी अर्जांची छाननी : 12 जुलै 2018
  • उमेदवारी मागे घेण्याची तारीख : 17 जुलै 2018 पर्यंत
  • निवडणूक चिन्ह वाटप : 18 जुलै 2018
  • मतदान : 1 ऑगस्ट 2018
  • मतमोजणी : 3 ऑगस्ट 2018
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

प्रकाश आंबेडकरांच्या अल्प प्रतिसादामुळे विधानसभेतही काँग्रेस-राष्ट्रवादीच एकत्र !

News Desk

प्रियांका चतुर्वेदी आज शिवसेनेत प्रवेश करणार

News Desk

#LokSabhaElections2019 : महाराष्ट्रातील प्रतिष्ठेच्या लढती

News Desk