नांदेड | नांदेडमधील बिलोली येथील एका शाळेमध्ये एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर २ शिक्षकांनी लैंगिक अत्याचार केल्याचा अत्यंत संतापजनक प्रकार समोर आला आहे. जवळपास २ महिन्यांपूर्वी या २ आरोपी शिक्षकांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचा व्हिडीओ दाखवतो असे सांगत एक अश्लील व्हिडीओ दाखवून संबंधित विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली. संबंधित पीडितेला सध्या नांदेड येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणात आरोपी असलेल्या दोन्ही शिक्षकांवर त्याचप्रमाणे त्यांना मदत करणाऱ्या ३ जणांवर शनिवारी (१८ जानेवारी) रोजी रामतिर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नांदेडमधील बिलोली येथील शंकरनगरमधील सातवी इयत्तेत शिकणाऱ्या मुलीवर २ महिन्यांपूर्वी तिच्याच दोन शिक्षकांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचा व्हिडीओ दाखवतो असे सांगत शाळेच्या एका खोलीत नेऊन तिला अश्लील व्हिडीओ दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. दरम्यान, सर्व प्रकाराविषयी पीडीत विद्यार्थिनीने आपल्या आईला सांगितल्यानंतर त्यांनी आरोपी शिक्षकांविरोधात मुख्याध्यापकांकडे तक्रार दाखल देखील केली. मात्र, मुख्याध्यापकांनी या प्रकाराविरोधात कोणतेही पाऊल उचलले नाही. उलट त्यांच्यावर दबाव टाकण्यात आला. यातील धक्कादायक बाब म्हणजे, आरोप शिक्षकांना मुख्याध्यापक आणि संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनीच मदत केल्याचे समोर येत आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.