HW News Marathi
राजकारण

गिरीश महाजनांच्या संपर्क कार्यलयाजवळ बॉम्ब असल्याचा निनावी फोन

जळगाव | भाजप नेते आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या संपर्क कार्यालयाजवळ बॉम्ब असल्याचा निनावी फोन सोमवारी (१७ जून) जिल्हा पेठ पोलिसांना आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली होती. दरम्यान, बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाने तातडीने गिरीश महाजन यांच्या कार्यालयाच्या परिसरात तब्बल अर्धा तास शोध घेतल्यानंतर या परिसरात संशयजनक असे काहीही सापडले नाही. याबाबत चौकशी केल्यानंतर हा निनावी फोन म्हणजे निव्वळ कोणाचातरी खोडसाळपणा असल्याचे निष्पन्न झाले. सोमवारी संध्याकाळी ७.३० च्या सुमारास हा संपूर्ण प्रकार घडला.

जळगाव पोलीस नियंत्रण कक्षाला सोमवारी संध्याकाळी ७.३०च्या सुमारास एक निनावी फोन आला. या फोनवरून गिरीश महाजन यांच्या संपर्क कार्यालयात बॉम्ब असल्याची माहिती देण्यात आली. त्यानंतर थोड्याच वेळात जिल्हापेठ पोलीस ठाण्यात देखील त्याच व्यक्तीचा फोन आला. त्यानंतर तातडीने जिल्हापेठ पोलिसांनी तातडीने बॉम्ब शोधक व नाशक पथकाने महाजन यांच्या संपर्क कार्यालयाच्या परिसरात शोध घेतला. मात्र, यावेळी पोलिसांना काहीही संशयजनक किंवा आक्षेपार्ह आढळले नाही. मात्र, पोलिसांनी याची गंभीर देखल घेतली असून ज्या क्रमांकावरून पोलिसांना फोन आला आहे त्याची माहिती काढली जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

HW Exclusive | आक्षेप माझ्यावर की महात्मा गांधींच्या विचारावर ?

Gauri Tilekar

राफेलबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे दसॉल्ट एव्हिएशनने केले स्वागत

News Desk

भाजपने व्यक्तिगत टीका न करता आमच्याशी विकासाच्या मुद्द्यांवर बोलावे !

News Desk