HW News Marathi
राजकारण

प्रदेशाध्यक्षपदी सिंधिया यांना नियुक्त करा, अन्यथा राजीनामे देऊ !

नवी दिल्ली | लोकसभा निवडणुकीत आलेल्या पराभवानंतर मध्य प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांनी राज्याचे प्रदेशाध्यक्ष कमलनाथ यांच्या नेतृत्त्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत कमलनाथ यांच्या ऐवजी ज्योतिरादित्य सिंधिया यांना मध्य प्रदेश काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष बनविण्याची मागणी केली जात आहे. काँग्रेसचे राज्य सचिव विकास यादव यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना पत्र लिहून ही मागणी केली आहे. ज्योतिरादित्य सिंधिया यांना प्रदेशाध्यक्षपदी नियुक्त करा अन्यथा सर्वच पदाधिकारी राजीनामा देतील, असेही या पत्रात म्हणण्यात आले आहे.

“राज्याचे मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष पद एकाच व्यक्तीकडे असल्याने कार्यकर्त्यांचे ऐकले जात नाही. कार्यकर्त्यांच्या सूचनांकडे दुर्लक्ष केले जाते. म्हणूनच काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे. राज्यात शेतकरी कर्जमाफी देखील अर्धवटच झाली. त्याचाही फटका पक्षाला बसला”, असेही विकास यादव यांनी म्हटले आहे. लोकसभेत काँग्रेसला मध्यप्रदेशमधील २८ पैकी एकाच जागेवर विजय मिळाला. या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेश काँग्रेसकडून राज्यातील नेतृत्त्वात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ऋतुजा लटकेंचा राजीनामा मुंबई महानगरपालिकेडून मंजूर

Aprna

राहुल गांधी नांदेडमधून निवडणूक लढणार ?

News Desk

“मी स्वत: सत्तेच्या खुर्चीवर उडी मारून बसणार नाही”, राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना टोला

Aprna