नवी दिल्ली | गेल्या अनेक दिवसांपासून देशात राफेल विमान खरेदी करार प्रकरण वेगवेगळी वळणे घेत आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राफेलबाबत कायमच आक्रमक भूमिका घेत पंतप्रधान मोदी आणि मोदी सरकारवर टीका केली आहे. “अरुण जेटली यांनी आपल्या भाषणात ५८०० कोटी रुपयांच्या कराराचा उल्लेख केला. ५८०० ला ३६ ने भागल्यानंतर १६०० येतात. याचाच अर्थ एका लढाऊ विमानाची किंमत १६०० कोटी एवढी आहे हे स्वतः अरुण जेटली यांनीच आपल्या भाषणातून सांगितले आहे. त्यांच्याच भाषणातून काँग्रेसला लढाऊ विमानाची किंमत समजली”, असे राहुल गांधी यावेळी म्हणाले. “मला राफेल लढाऊ विमान खरेदी प्रकरणावर पंतप्रधान मोदींसह चर्चा करायला खूप आवडेल. परंतु, पंतप्रधान मोदींमध्ये पत्रकार परिषद देखील घेण्याची देखील हिंमत नाही”, असेही राहुल गांधी यावेळी म्हणाले.
Rahul Gandhi: I would very much like to debate one on one on the #RafaleDeal with the Prime Minister pic.twitter.com/yJcezHzGSF
— ANI (@ANI) January 2, 2019
अरुण जेटली यांच्या म्हणण्याप्रमाणे जर राफेल लढाऊ विमानांच्या किंमतीत घट झाली असेल तर लढाऊ विमानांची संख्या वाढविण्यात का आली नाही ?, असाही प्रश्न यावेळी राहुल गांधी यांनी केला आहे. त्याचप्रमाणे, “निर्मला सीतारामन कधी म्हणतात राफेलची किंमत सांगणार नाही, नंतर म्हणतात राफेलची किंमत सांगणार, मग परत म्हणतात राफेलची किंमत सांगणार नाही”, असे का ? असा सवाल यावेळी राहुल गांधींनी उपस्थित केला आहे.
“कोणीही कितीही म्हणाले तरी देशाला हे सत्य माहित आहे कि या करारामार्फत पंतप्रधान मोदी यांनी आपला मित्र अनिल अंबानी याला ३०००० कोटी रुपये मिळवून दिले, १२६ लढाऊ विमानांची आवश्यकता असताना विमानांची संख्या कमी करून ३६ वर आणली”, असेही राहुल गांधी यांनी यावेळी म्हटले आहे. राफेल मुद्द्यावरून सभागृहात झालेल्या गदारोळानंतर राहुल गांधी यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी “चौकीदार चोर है” असे पुन्हा एकदा म्हटले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.