नवी दिल्ली | अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी पैसे देऊन मत विकत घेण्याचा आरोप काँग्रेस प्रवक्ता रणदीप सुरजेवालानी केला आहेत. सुरजेवाला यांनी काँग्रस पत्रकार परिषदेत त्यांनी पैसे पकडल्याचा व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. खांडू यांच्या ताफ्यातील कारमध्ये १ कोटी ८० लाख रुपये जप्त करण्यात आल्याचे सुरजेवाला यांनी सांगितले.
Randeep Surjewala, Congress: Even as PM Modi addressed an election rally in Pasighat, Arunachal Pradesh today, a sensational ‘Cash for Vote Scandal’ is exposed where authorities found Rs. 1.8 crore from the convoy of BJP CM Pema Khandu & BJP Arunachal Pradesh President Tapir Gao. pic.twitter.com/wnbQ8XTUXN
— ANI (@ANI) April 3, 2019
याशिवाय, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज (३ एप्रिल) आगामी लोकसभा निवडणुकीसाठी अरुणाचल प्रदेशात प्रचारसभा होणार होती. खांडू यांच्या ताफ्यातील कारमध्ये जप्त करण्यात आलेल्या पैशांचा वापर हा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रचारसभेत लोकांची गर्दी वाढवण्यासाठी करण्यात येणार होता का ? आणि हा काळा पैसे आहे का? असे सवाल सुरजेवाला पत्रकार परिषदेत उपस्थित केला होता.
या प्रकरणामध्ये अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू, उपमुख्यमंत्री आणि प्रदेश अध्यक्षांचा समावेश आहे. तसेच मोदी हे गप्प का आहेत? निवडणूक आयोगाने देखील शांत कसे आहे. अजूनही त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला नाही, अशी मगाणी करत अनेक प्रश्न देखील सुरजेवला यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.