नवी दिल्ली | पंतप्रधानांचे मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यन पायउतार होणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री अरूण जेटली यांनी दिली आहे. सुब्रमण्यन यांना कौटुंबिक कारणांमुळे अमेरिकेला परतावे लागणार असल्याचे जेटलींनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.
I was very much in Delhi on the day of demonetization: Arvind Subramanian on being asked if he was present in the capital on the day of demonetization announcement. He also said that, 'Soon the process will be started for choosing my successor, let us see how it turns out.' pic.twitter.com/xrflW41rOS
— ANI (@ANI) June 20, 2018
१६ ऑक्टोबर २०१४ रोजी सुब्रमण्यन यांची मुख्य आर्थिक सल्लागारपदी नियुक्ती झाली होती. गेल्यावर्षी त्यांना १ वर्षाची मुदतवाढ देण्यात आली. काही दिवसांपूर्वी आपली व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सुब्रमण्यान यांच्याशी चर्चा झाली. यावेळी त्यांनी अमेरिकेला परत जाण्याची इच्छा व्यक्त केली होती.
अरविंद सुब्रमण्यन यांनी दिलेली कारणे वैयक्तिक आणि त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहेत. त्यामुळे त्यांच्या निर्णयावर राजी होण्याखेरीज आपल्यासमोर पर्याय उरला नसल्याचे जेटलींनी लिहिले आहे. सुब्रमण्यम यांच्या कामाचे कौतूक करून आपल्याला व्यक्तिगतरित्या त्यांची उणीव जाणवेल, असेही माजी अर्थमंत्री अरूण जेटलींनी म्हटले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.