HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

शिवाजी पार्कच्‍या बाभळीला बारामतीची बोरे, आशिष शेलारांची बोचरी टीका

मुंबई | आगामी लोकसभा निवडणुका जसजशा जवळ येत आहेत तसतसे देशातील राजकीय वातावरण तापत आहे. देशातील राजकीय पक्षांकडून एकमेकांवर निशाणा साधला जात आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर बोचरी टीका केली आहे. “सोडून गेले नगरसेवक…सोडून गेले आमदार…एकटे एकटे वाटले म्‍हणून स्‍वतःच्‍या काकांच्या नाही..जाणत्‍या राजाला गाठले..पाठीवर हात ठेऊन..नव्या भाषणाची स्क्रिप्‍ट हातात देऊन.. बारामतीच्‍या काकांनी “फक्त लढ” असे म्‍हटले.!! एवढचं नाही तर “शिवाजीपार्कच्‍या बाभळीला बारामतीची बोरे”, असा टोला आशिष शेलार यांनी ट्विट करून राज ठाकरे यांना लगावला आहे.

गेल्या काही काळात मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाढलेल्या जवळीकीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. आगामी निवडणुकांसाठी राज ठाकरे राष्ट्रवादीसोबत जाणार अशी जोरदार चर्चा होती. राज ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात होणाऱ्या बैठकांमुळे ही शक्यता दाट होत होती. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील राज ठाकरेंना टोला लगावला होता. राज ठाकरे यांची स्क्रिप्ट बारामतीहून तयार होऊन येते, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली होती.

Related posts

स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करणार, दिल्ली सरकारचा मोठा निर्णय

News Desk

उध्दव, राज व आंबेडकर यांची निवडणुकीत ईव्हीएम मशीन ऐवजी बॅलेट पेपरची मागणी

News Desk

कवी मनाचे महानेतृत्व हरपले | आठवले

News Desk