HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

अशोक चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज वैधच, फेटाळले सर्व आक्षेप

मुंबई । काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सोमवारी (२५ मार्च) नांदेडमधून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, दोन अपक्ष उमेदवारांकडून अशोक चव्हाण यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेण्यात आला होता. जिल्हाधिकारी आणि मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी अरुण डोंगरे यांनी बुधवारी (२७ मार्च) रात्री याबाबतचा निकाल जाहीर केला. यावेळी अशोक चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज वैध असल्याचे म्हणत म्हणत त्यांच्या उमेदवारी अर्जावरील सर्व आरोप फेटाळून लावण्यात आले आहेत. अशोक चव्हाण यांना या प्रकरणी क्लीन चिट दिली आहे.

अशोक चव्हाण यांच्या उमेदवारी अर्जावरील सर्व आक्षेप फेटाळून लावल्याने काँग्रेसला मोठा दिलासा मिळाला आहे. नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीतील उमेदवारी अर्जांच्या छाननीच्या दिवशी चव्हाण यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेण्यात आला होता. अशोक चव्हाण यांच्या प्रतिज्ञापत्रात २०१४ साली दाखल केलेल्या शपथपत्रात १ कोटी ५६ लाख ५७ हजार, आणि ८७ लाख रुपयांचे वेगवेगळे फंड दाखविले होते. परंतु यावेळी त्याचा कुठेही उल्लेख केला गेला नाही. म्हणून, या २ अपक्ष उमेदवारांनी आक्षेप घेतले होते.

Related posts

प्रश्न हैदराबादचे भाग्यनगर कधी होणार हा नसून अयोध्येत राममंदिर कधी होणार !

News Desk

गडचिरोलीत मतदान करून परतणाऱ्या मतदारांचा भीषण अपघात, ३ जणांचा मृत्यू

News Desk

राजीनामा देण्यासाठी आरबीआय गव्हर्नर यांच्यावर केंद्र सरकारचा दबाव ?

अपर्णा गोतपागर