HW News Marathi
राजकारण

पोलिसांनी आपल्याला नजरकैदेत ठेवल्याचा आझाद यांचा आरोप

मुंबई | मालाडमधील एका हॉटेलमध्ये आपल्याला पोलिसांनी नजरकैदेत ठेवल्याचा आरोप स्वतः भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद उर्फ रावण यांनी केला आहे. चंद्रशेखर आझाद हे सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. यावेळी चंद्रशेखर आझाद हे मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात एकूण चार जाहीर सभा घेणार आहेत. भीमा-कोरेगाव येथे ३० डिसेंबरला आझाद यांची जाहीर सभा होणार असून या सभेत आझाद नेमके काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. गेल्या वर्षी झालेल्या भीमा-कोरेगाव हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर यावेळी पुन्हा तशा प्रकारची स्थिती निर्माण होऊ नये, असे मत व्यक्त केले जात आहे.

दरम्यान, काहीच दिवसांपूर्वी कायदा सुव्यवस्थेच्या कारणास्तव मुंबई पोलिसांनी ‘भीम आर्मी’च्या सभेला परवानगी नाकारली होती. भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद उर्फ रावण यांच्या सभेसाठी भीम आर्मीने वरळीतील जांबोरी मैदानात त्याचप्रमाणे दादरच्या चैत्यभूमी परिसरात सभेच्या आयोजनाची परवानगी मागितली होती. परंतु, मुंबई पोलिसांनी या कार्यक्रमासाठीची परवानगी नाकारली आहे.

जे स्थळ निश्चित करण्यात आले तेथेच सभा होणार

भीमा-कोरेगाव हे आमचे तीर्थस्थळ असून सभेसाठी जे स्थळ निश्चित करण्यात आले आहे तेथेच जाहीर सभा होणार असल्याचे आझाद यांनी स्पष्ट केले आहे. त्याचप्रमाणे या परिसरातील वातावरण खराब होऊ नये ही जबाबदारी सरकारची आहे, असे चंद्रशेखर आझाद यांनी एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

#RafaleDeal : कॅगच्या अहवालाबाबत राहुल गांधींची पत्रकार परिषद

Gauri Tilekar

#AyodhyaCase | अयोध्या प्रकरणी उद्या सर्वोच्च न्यायालय देणार निकाल

News Desk

‘मातोश्री’वर उद्धव ठाकरे आणि गौतम अदानी यांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

Aprna
राजकारण

खरंतर ‘हा’ चित्रपट ऑस्करला जायला हवा !

News Desk

मुंबई | माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या राजकीय जीवनावर आधारित ‘द अ‍ॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ या चित्रपटावरून राजकारण चांगलेच तापले आहे. या चित्रपटात मनमोहन सिंग यांची भूमिका साकारणारे अभिनेता अनुपम खेर यांनी आता या संपूर्ण वादावर भाष्य केले आहे. “खरंतर हा चित्रपट ऑस्करला जायला हवा. परंतु, आपल्याकडे या चित्रपटावरून वाद सुरु आहे”, असे अनुपम यांनी म्हटले आहे. ‘या चित्रपटात अनेक घटना या चुकीच्या पद्धतीने आणि अर्धवट मांडण्यात आल्या आहेत’, असा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे. तर काँग्रेस चित्रपटांच्या स्वातंत्र्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करत असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे.

“या चित्रपटात मनमोहन सिंग यांची भूमिका साकारताना अभिनय नैसर्गिक वाटावा यासाठी मी अनेक पुस्तके वाचली. माझ्या चित्रपटसृष्टीतील ३५ वर्षांच्या करियरमध्ये आणि ५१५ चित्रपटांमधील हा सर्वात कठीण चित्रपट आहे. खरंतर हा चित्र ऑस्करसाठी जायला हवा. परंतु, या चित्रपटावरून वाद सुरु झाला आहे. आजपासून २५ वर्षांनंतर जेव्हा चित्रपटांचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा या चित्रपटाचे नाव पहिले असेल”, असेही अनुपम खेर यांनी यावेळी म्हटले.

‘द अ‍ॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ या चित्रपटाचा ट्रेलर लॉंच झाल्यानंतरच या चित्रपटावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. हा चित्रपट सर्वप्रथम काँग्रेसच्या नेत्यांना दाखविण्यात यावा, अशी मागणी काँग्रेसकडून केली जात आहे. तसे झाले नाही तर काँग्रेस या चित्रपटाविरोधात न्यायालयात जाईल, असा इशारा देखील काँग्रेसकडून देण्यात आला आहे.

Related posts

#IrrigationScam : चौकशीला सहकार्य करणार, माझा न्यायव्यवस्थेवर संपूर्ण विश्वास !

News Desk

मावळा छत्रपतींचे मन वळवू शकत नाही !

News Desk

शिवसेना कोणाच्याही बापाची मक्तेदारी नाही !

News Desk