भोपाळ | राजस्थान, तेलंगणा, मध्यप्रदेश, मिझोराम, छत्तीसगढ या पाचही राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठीची मतदान प्रक्रिया पूर्ण झाली असून मंगळवारी (११ डिसेंबर) रोजी या निवडणुकांचे निकाल जाहीर होतील. विविध वृत्तवाहिन्यांच्या एक्झिट पोलमधून मध्य प्रदेशात जनमत काँग्रेसच्या बाजूने झुकल्याचे चित्र दिसत असल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास दुणावलेला दिसत आहे. दरम्यान, या निवडणुकांचे निकाल जाहीर होण्यापूर्वीच मध्य प्रदेशमधली काँग्रेसच्या अनेक गटांनी मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून आपापल्या नेत्यांची नावे सुचविण्यास सुरुवात केली आहे.
Kamal Nath when asked who will be the CM if Congress wins in Madhya Pradesh: We will win more than 140 seats. Wait till tomorrow, everything will be clear by then. pic.twitter.com/vNJt5wY8Hi
— ANI (@ANI) December 10, 2018
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कमलनाथ यांचे देखील पक्षाच्या प्रदेश कार्यालयात समर्थकांनी घोषाबाजी करत जोरदार स्वागत केले. दरम्यान, मध्य प्रदेश काँग्रेसकडे मुख्यमंत्रीपदासाठी कमलनाथ आणि ज्योतिरादित्य शिंदे हे दोन उमेदवार आहेत. कमलनाथ यांच्या कार्यकर्त्यांनी कमलनाथ यांचे अभिनंदन करणारे बॅनर्स पक्षाच्या प्रदेश कार्यालयाच्या परिसरात लावले आहेत. दरम्यान, याबाबत बोलताना कमलनाथ म्हणाले कि, “वाट पहा, उद्यापर्यंत सर्व चित्र स्पष्ट होईल.”त्याचप्रमाणे “काँग्रेस १४० हुन अधिक जागांवर जिंकून येईल”, असा विश्वास देखील कमलनाथ यांनी व्यक्त केला आहे.
Poster seen outside Madhya Pradesh Congress Committee office in Bhopal. #MadhyaPradeshElections2018 pic.twitter.com/w51FutVuY2
— ANI (@ANI) December 10, 2018
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.