HW News Marathi
राजकारण

…कारण ५६ इंचाची छाती असणारा चौकीदार चोर आहे !

नवी दिल्ली | “पंतप्रधान मोदींनी राफेल विमान खरेदी करारात अनिल अंबानी यांना ३०,००० कोटी रुपयांचा फायदा करून दिला आहे. राफेल मुद्द्यावर संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी अडीच तास आम्ही बाजू मांडली. जेव्हा मी राफेलबाबत चर्चा करण्यासाठी २० मिनिटे मागितली तेव्हा चौकीदार पळून गेला. कारण, ५६ इंचाची छाती असणारा चौकीदार चोर आहे”, असा टोला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लगावला आहे.

राहुल गांधी राजस्थान जयपूरमध्ये पक्षाच्या किसान रॅलीला संबोधित करीत होते. “आम्ही केवळ दोन दिवसांमध्ये शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले. काँग्रेसने राजस्थानच्या शेतकऱ्यांना कर्जमाफीची जे आश्वासन दिले होते ते पूर्ण केले आहे. आम्ही या पुढेही देशातील शेतकऱ्यांसोबत मिळून कष्टाने काम करू”, असे आश्वासन देखील राहुल गांधी यांनी दिले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

INX Media Case : पी. चिंदबरम यांना ईडी अटक करू शकत नाही

News Desk

अंधेरी पोटनिवडणुकीसंदर्भात शरद पवारांच्या भूमिकेबदद्ल उद्धव ठाकरेंनी पत्र लिहून मानले आभार

Aprna

आपण संघाच्या चांगल्या गोष्टी आत्मसात करायला हव्यात !

News Desk