HW News Marathi
राजकारण

सत्ताधाऱ्यारी-विरोधकांमध्ये विधानभवनाच्या पायऱ्यांवर एकमेकांविरोधात घोषणाबाजी

मुंबई | हिवाळी अधिवेशनाचा (Winter Session) आज दुसरा दिवस आहे. विधीमंडळाचे आजचे (20 डिसेंबर) कामकाज सुरु होण्याआधी विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधक-सत्ताधाऱ्यांमध्ये बॅनरबाजी आणि घोषणाबाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. हिवाळी अधिवेशनाचा आज दुसऱ्या दिवशी विधानभवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी आणि विरोधक सामने-सामने आल्याचे आगळेवेगळे चित्र बघायला मिळाले. दोन्ही पक्षांनी हातात बॅनर घेऊन एकमेकांविरोधा घोषणा देत होते. विरोधकांनी “50 खोके, एकदम ओके”, अशा घोषणा दिल्या तर सत्ताधाऱ्यांनी “50 आमदार एकदम ओके घरी बसवले माजलेले बोके”, असे बॅनर घेऊन घोषणाबाजी केली आहे.

 

राज्यपाल हटाव, महाराष्ट्र बचाव… नही चलेगी नही चलेगी तानाशाही नही चलेगी… न्यायालयाचा अवमान करणार्‍या मुख्यमंत्र्यांचा धिक्कार असो… विदर्भाला न्याय न देणार्‍या सरकारचा धिक्कार असो… ५० खोके एकदम ओके…आनंदाचा शिधा कोणी खाल्ला, जनता म्हणते आम्ही नाही खाल्ला…राजीनामा द्या राजीनामा द्या मुख्यमंत्री राजीनामा द्या…या सरकारचे करायच काय खाली डोके वर पाय…खाउन महाराष्ट्राची भाकरी करतात गुजरातची चाकरी… ईडी सरकार हाय हाय… गुजरात तुपाशी महाराष्ट्र उपाशी…छत्रपती शिवाजी महाराज की जय…अशा गगनभेदी घोषणा देत महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्‍यांवर येत आज दुसऱ्या दिवशीही ईडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

नागपूर येथे हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असून आज दुसऱ्या दिवशीही महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या परिसर दणाणून सोडला. विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली आजही महाविकास आघाडीच्या आमदारांनी ईडी सरकारविरोधात आंदोलन केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

डॉ. पायल आत्महत्या प्रकरण | तिन्ही महिला आरोपींना १० जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी

News Desk

भाजप म्हणजे हिंदुत्त्व नव्हे, अयोध्येत उद्धव ठाकरेंनी साधला निशाणा

News Desk

विधान परिषदेच्या निकालानंतर ‘मविआ’मध्ये मोठा स्फोट; शिवसेनेचे एकनाथ शिंदे नॉट रिचेबल 

Aprna