HW Marathi
राजकारण

राज ठाकरेंच्या भेटीसाठी बेस्टचे शिष्टमंडळ ‘कृष्णकुंज’वर

मुंबई | बेस्टचे शिष्टमंडळ आज (१० जानेवारी) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी ‘कृष्णकुंज’वर दाखल झाले आहे. यावेळी या बेस्ट कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय देखील त्यांच्यासोबत आहेत. गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाला मनसेकडून पाठिंबा जाहीर करण्यात आल्यानंतर आज सकाळी १०.३० च्या सुमारास सर्व बेस्ट कर्मचारी आपल्या कुटुंबियांसह कृष्णकुंजवर पोहोचले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना अखेरपर्यंत बेस्ट कर्मचाऱ्यांच्या पाठीशी उभी राहील, असे आश्वासन मनसेकडून देण्यात आले होते.

Related posts

जोरमथंगा यांनी घेतली मिझोरमच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ

News Desk

आज संध्याकाळी रामदास आठवले, महादेव जानकर घेणार मुख्यमंत्र्यांची भेट

News Desk

लाचारी माझ्या रक्तात नाही, माझ्या वडिलांनी आम्हाला स्वाभिमान शिकवला !

News Desk