HW News Marathi
राजकारण

बेस्टच्या संपाचा आज पाचवा दिवस, बेस्ट कर्मचारी आपल्या भूमिकेवर ठाम

मुंबई | बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज पाचवा दिवस आहे. प्रशासन आणि कामगार संघटना दोघेही त्यांच्या भूमिकांवर ठाम असल्याने या संपावर अद्याप कोणताही काही तोडगा निघालेला नाही. अखेर काल (११ जानेवारी) संध्याकाळी झालेल्या बेस्ट कर्मचारी मेळाव्यात बेस्ट कृती समितीचे कामगार नेते शशांक राव यांनी बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट केले. बेस्टच्या संपात आम्ही हस्तक्षेप करणार नसल्याचे मुंबई उच्च न्यायालयाकडून सांगण्यात आले आहे. याबाबतची पुढील सुनावणी सोमवारी (१४ जानेवारी) होणार आहे.

बेस्ट कर्मचाऱ्यांच्या या संपावर आज (१२ जानेवारी) सकाळी ११ च्या सुमारास राज्य सरकारच्या उच्च स्तरीय समितीची बैठक होणार आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी त्रिसदस्यीय समिती नेमण्यात आल्याची माहिती राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयात दिली आहे. संप मिटल्याची घोषणा करण्याचा आग्रह सरकार आणि पालिकेकडून बेस्टच्या कर्मचाऱ्यांना केला जात असताना संपावर तोडगा काढल्याशिवाय आम्ही संप मागे घेणार नाही, अशी ठाम भूमिका संघटनांकडून स्पष्ट करण्यात आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोण आहेत राष्ट्रवादीचे ३१ प्रवक्ते ?  

News Desk

काँग्रेसच्या जाहीरनाम्यासाठी रघुराम राजन करणार मदत ?

News Desk

अशोक चव्हाणांनी ‘मविआ’च्या महामोर्चात अनुपस्थित; कारण…

Aprna